Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तोरणमाळ पर्यटन विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक

team by team
August 6, 2026
in राजकीय
0
तोरणमाळ पर्यटन विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्ह्यातील तोरणमाळ पर्यटन विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी पर्यटन विभागाच्या वतीने मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक संपन्न झाली. राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

बैठकीत तोरणमाळ पर्यटनस्थळाचा सर्वांगीण विकास, पर्यटन सुविधांचा विस्तार, पायाभूत सुविधा बळकटीकरण तसेच पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांनी विकासकामांची सद्यस्थिती, प्रलंबित बाबी आणि पुढील कृती आराखडा सादर केला.

यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी यांनी चर्चेत सहभागी होऊन मुद्दे मांडले.यावेळी विभागाचे अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, पर्यटन संचालनालयाचे अधिकारी, नंदुरबारचा जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, उपसंचालक (पर्यटन) तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत तोरणमाळचा पर्यटन विकास अधिक गतिमान करण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधून आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच मंजूर विकासकामे वेळेत पूर्ण करून तोरणमाळला राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात आला.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार आगार येथे राजमाता जिजाऊ नवीन बसेसचे लोकार्पण

Next Post

तोरणमाळ पर्यटन विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक

Next Post
तोरणमाळ पर्यटन विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक

तोरणमाळ पर्यटन विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तोरणमाळ पर्यटन विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक

तोरणमाळ पर्यटन विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक

August 6, 2026
तोरणमाळ पर्यटन विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक

तोरणमाळ पर्यटन विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक

August 6, 2026
नंदुरबार आगार येथे राजमाता जिजाऊ नवीन बसेसचे लोकार्पण

नंदुरबार आगार येथे राजमाता जिजाऊ नवीन बसेसचे लोकार्पण

August 6, 2026
सोशल मीडियावर तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाला अटक

सोशल मीडियावर तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाला अटक

August 6, 2026
कॉलेज परिसरात तलवार व कुकरी बाळगून फिरणारा इसम जेरबंद

कॉलेज परिसरात तलवार व कुकरी बाळगून फिरणारा इसम जेरबंद

August 6, 2026
रक्तदानाचे महत्त्व आदिवासींच्या मनावर बिंबवणे काळाची गरज : डॉ. हिना गावित

रक्तदानाचे महत्त्व आदिवासींच्या मनावर बिंबवणे काळाची गरज : डॉ. हिना गावित

August 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add