नंदुरबार | प्रतिनिधी
स्वातंत्र्यानंतर आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात पहिल्यांदा कम्युनिटी रेडीओ स्टेशन सुरू होत आहे. डॉ. हेडगेवार सेवा समिती कृषि विज्ञान केंद्र, कोळदा, ता.जि. नंदुरबार येथे विकास भारती कम्युनिटी रेडीओ केंद्राचे उद्घाटन उद्या दि.२४ ऑक्टोंबर रविवार रोजी सकाळी ११ वाजेला आयोजीत करण्यात आले आहे.विकास भारती कम्युनिटी रेडीओ केंद्राव्दारे कृषि तज्ञांचे मार्गदर्शन, हवामान अंदाज, प्रयोगशील शेतकर्यांचे अनुभव रेडिओद्वारा शेतकरी बांधवांना घरी बसून वा शेताच्या बांधावर प्राप्त होणार आहे.
डॉ . हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबारद्वारा संचलित , विकास भारती कम्युनिटी रेडिओ केंद्रास सूचना आणि प्रसारण मंत्रालय , भारत सरकार यांची मान्यता मिळाली आहे . सांस्कृतिक , सामाजिक , शैक्षणिक , कृषि , आरोग्य , पर्यावरण , कला – क्रिडा , साहित्य , लोककला इ . राष्ट्रीय संस्कारात्मक विषयांसाठी रेडिओ विकास भारती हे प्रभावी आणि हक्काचे व्यासपीठ असेल . कृषि तज्ञांचे मार्गदर्शन , हवामान अंदाज , प्रयोगशील शेतकर्यांचे अनुभव रेडिओद्वारा शेतकरी बांधवांना घरी बसून वा शेताच्या बांधावर प्राप्त होणार असून ही प्रभावी कृषि चळवळ ठरेल . ओढ ज्ञानाची जोड संस्कृतीची हे ब्रिद घेऊन रेडिओ विकास भारती , एफ एम ९०.८ या केंद्राचे उद्घाटन उद्या दि.२४ ऑक्टोंबर रविवार रोजी सकाळी ११ वाजेला डॉ . हेडगेवार सेवा समिती , कृषि विज्ञान केंद्र , कोळदा , ता . जि . नंदुरबार येथे मान्यवरांच्या हस्ते आयोजीत करण्यात आले आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन डॉ . हेडगेवार सेवा समिती अध्यक्ष कृष्णदासभाई पाटील, उद्घाटक म्हणुन कुलगुरू , य.च.म.मु. वि. नाशिक, डॉ. ई . वायुनंदन, प्रमुख अतिथी म्हणुन खा. डॉ . हिना गावित, संचालक , विशेष अतिथी म्हणुन भा.कृ.अ.प. अटारी , पुणे.डॉ. लाखन सिंग, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, सहाय्यक महा प्रबंधक , नाबार्ड , नंदुरबार प्रमोद पाटील, कार्यकारणी मंडळ व सभासद डॉ . हेडगेवार सेवा समितीचे सचिव डॉ . नितीन पंचभाई, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषि विज्ञान केंद्र राजेंद्र दहातोंडे आदी उपस्थीत राहणार आहेत.








