Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विधी सेवा सामान्य नागरिकांचा अधिकार: न्यायाधीश व्ही.पी. शिंदे यांचे प्रतिपादन

team by team
October 23, 2021
in क्राईम
0
विधी सेवा सामान्य नागरिकांचा अधिकार:  न्यायाधीश व्ही.पी. शिंदे यांचे प्रतिपादन
अक्कलकुवा l प्रतिनिधी
स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार  यांच्या निर्देशनाप्रमाणे पॅन इंडीया योजने अंतर्गत कायदेविषयक शिबिराचे आयोजन    तालुका विधी सेवा समितीच्या वतीने   तालुक्यातील भाबलपूर  जिल्हा परिषद शाळेच्या आवारात कायदेविषयक चर्चा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.विधी सेवा सामान्य नागरिकांचा अधिकार असल्याचे प्रतिपादन न्यायाधीश व्ही.पी. शिंदे यांनी प्रतिपादन केले.
         प्रारंभी , मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे  प्रास्तविक ॲड.पी.आर.ठाकरे यांनी केले.   २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान देशभरात कायद्याची माहिती व्हावी.  यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. ॲड. संग्राम पाडवी यांनी वरिष्ठ नागरिकांचे अधिकार या विषयावर  व  कौटुंबिक हिंसाचार कायदा या विषयावर मार्गदर्शन केले.
              महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार  यांच्या निर्देशनाप्रमाणे पॅन इंडीया योजने अंतर्गत कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश व्ही.पी.शिंदे यांनी बळी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांसाठी असलेल्या नुकसान भरपाई योजनेचे अंमलबजावणी विधी सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून केली जाते.   यासाठी नागरिकांकडून प्राप्त अर्ज सबंधित समितीसमोर ठेवण्यात येतात.ज्या लोकांना कोर्ट कचेरी करण्याची आर्थिक कुवतच नाही अशा लोकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. वकीलाला द्यावी लागणारी फी , कोर्टात दावा दाखल करण्यासाठी येणारा खर्च उभा करता येत नाही .  मात्र , अशा गरजु आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील न्याय यंत्रणेकडून विधी सेवा प्राधिकरण सुरु करण्यात आले आहे.   या मध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत , वंचित घटकांपर्यंत , मानसिक आजाराने त्रस्त असलेले लोक अशा सर्व घटकांपर्यंत या कायदेविषयक शिबिराच्या  माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो.   विधी सेवा सामान्य नागरिकांचा अधिकार न्यायाधीश व्ही.पी. शिंदे  यांनी असे प्रतिपादन यावेळी केले व  समाजात दिवसेंदिवस होणारे बालविवाह थांबले पाहिजे व विनापरवाना अल्पवयीन मुलांना वाहन हाती देऊ नये व  विद्यार्थ्यानी शालेय जीवनापासून शिक्षक व आई,वडील यांच्या आदेशाचे तंतोतत पालन केले पाहिजे. अशीही अपेक्षा यावेळी न्यायाधीश व्ही.पी.शिंदे यांनी व्यक्त केली.    या कार्यक्रमास न्यायालयीन सहा.अधिक्षक विनायक एस.पाडवी ,    ॲड.डी.एस.पाडवी, ॲड.डी.डी.पाडवी , ॲड.प्रशांत वळवी, अंजना वळवी ,चंपाताई पाडवी ,शिवराम वळवी,सुशिला पाडवी,दुबीबाई पाडवी ,ईश्वर पाडवी ,गंभीरसिंग पाडवी ,देवराम पाडवी ,वसंत पाडवी ,पवार मॅडम ,   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.रुपसिंग वसावे यांनी केले व शिंपी सर यांनी आभार  मानले.कार्यक्रम यशस्वीते साठी  ॲड.प्रशांत वळवी , संतोष ठाकूर ,अनिल वसावे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात पहिल्यांदा कम्युनिटी रेडीओ स्टेशन होणार सुरू, विकास भारती कम्युनिटी रेडीओ केंद्राव्दार शेतकरी बांधवांना घरी बसून प्राप्त होणार विविध माहिती

Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील ४ हजार ८६३ शेतकरी झाले वीजबिलांमधून थकबाकीमुक्त तर १५ हजार ५७३ ग्राहकांनी भरले २२ कोटी ४० लाख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add