नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्दे येथील जिल्हा परिषदेतील १२० विद्यार्थ्यांना नंदुरबार शिवसेना उपतालुका प्रमुख सागर साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यातर्फे शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

उमर्दे खुर्दे ता.नंदुरबार येथे नंदुरबार शिवसेना उपतालुका प्रमुख तथा उपसरपंच सागर साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेच्या १२० दप्तर सरपंच अरविंद ठाकरे, उपसरपंच सागर साळुंखे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष जितेंद्र साळुंखे, सुरेश जाधव, मुख्याध्यापक राजेंद्र नारायण बागुल,शिक्षीका सौ. मीना वसंत पाटील,शिक्षक निलेश हिरालाल चव्हाण,जयेश मव्हाळ, गोरख जगताप, डिगंबर मराठे, निलेश बेंद्रे, जयेश मराठे, ज्ञानेश्वर सुदाम मराठे आदी उपस्थीत होते.या कार्यक्रमासाठी सागरभाऊ मित्र मंडळांने परिश्रम घेतले.








