Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोकाट गुरांसह वॉटर ऑडिट आणि विविध विषयांवर गाजली नंदुरबार नगरपालिकेची सर्वसाधारण सभा, 18 विषयांना मंजुरी

team by team
October 23, 2021
in राजकीय
0
मोकाट गुरांसह वॉटर ऑडिट आणि विविध विषयांवर गाजली नंदुरबार नगरपालिकेची सर्वसाधारण सभा, 18 विषयांना मंजुरी
नंदुरबार l प्रतिनिधी
 कोरोनामुळे तब्बल दीड वर्षानंतर प्रथमच ऑफलाइन झालेली आजची नंदुरबार नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शाब्दिक चकमक आणि आरोप प्रत्यारोप होऊन मोकाट गुरांसह वॉटर ऑडिट आणि विविध विषयांवर गाजली . अशातच संतप्त विरोधी नगरसेवकांनी सभात्याग केला . तथापि या गदारोळानंतर नगराध्यक्षा सौ . रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली 18 विषयांना मंजुरी देण्यात आली .
नंदुरबार नगर परिषदेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली . सभेला उपनगराध्यक्ष रवींद्र पवार उपस्थित होते . मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांच्या जागी अभियंता गावित यांनी कामकाज पाहिले . संजय माळी यांनी इतिवृत्त वाचून सभेला प्रारंभ केला . शहराच्या मंजूर विकास योजनेतील नगरपालिका मालकीच्या सिटी सर्वे नंबर 10 99 चे शाळेसाठी असलेले क्षेत्र प्राथमिक वाणिज्य प्रयोग करण्याबाबत निर्णय घेण्यात आला . रेल्वे स्टेशन रस्त्यावरील हॉटेल शर्मा ते उत्तरेस रेल्वे रस्ता काँक्रिटीकरण व ड्रेनेज लाईन कामासाठी 18 लाख 87 हजार 865 रुपये अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली . नंदुरबार नगर परिषद हद्दीतील मोकाट गुरे पकडली त्यांची कोंडवाड्यात वाहतूक करण्यासाठी खर्चास मंजुरी देण्यात आली . प्रभाग क्रमांक तीन मधील मोहन ट्रेडर्स पासून नगर पर्यंत तसेच रामकृष्ण नगर या भागात रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी 49 लाख 74 हजार रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली . आदी विषयांवर चर्चा करण्यात आली . शेवटी नगरपालिकेच्या विरोधी गटातील नगरसेवकांनी नगराध्यक्षां ऐवजी सत्ताधारी नगरसेवक बोलत असल्याच्या कारणावरून नगराध्यक्षा यांचा अवमान होत असल्याचे सांगून सभात्याग करीत दालना बाहेर निघून गेले . शहरातील मोकाट गुरांमुळे व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा निषेध करीत विरोधी पक्षाचे नगरसेवक चारुदत्त कळवणकर आणि प्रशांत चौधरी यांनी सभाग्रहात गदारोळ केला . यावर नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी पालिकेसह नागरिकांची देखील जबाबदारी असल्याचे सांगितले .
बातमी शेअर करा
Previous Post

आत्मा अंतर्गत महिला किसान दिनाचे औचित्य साधून महिला किसान दिवस व क्षेत्रीय किसान गप्पा गोष्टी

Next Post

नंदुरबार शिवसेना उपतालुका प्रमुख सागर साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त १२० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add