Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

team by team
June 4, 2026
in राजकीय
0
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

नंदुरबार l प्रतिनिधी-

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे 4 जून 2026 रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून विविध विकासकामांचा आढावा, प्रशासकीय बैठक, पत्रकार परिषद तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामकाजाची पाहणी करणार आहेत.

दौऱ्यानुसार पालकमंत्री श्री. मुश्रीफ हे 4 जून रोजी सकाळी नंदुरबार येथे आगमनानंतर शासकीय विश्रामगृहात दाखल होतील. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 या कालावधीत खरीप हंगाम पूर्वतयारी, वीजपुरवठा, खते व इतर समस्यानिवारणाबाबत आढावा बैठक घेतील. तसेच शेतकरी, नागरिक आणि जनप्रतिनिधींशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.

दुपारी 1.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून त्यानंतर पालकमंत्री काही वेळ राखीव ठेवणार आहेत. सायंकाळी 4.30 वाजता ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नंदुरबार येथे भेट देऊन रुग्णालयातील सुविधा, वैद्यकीय सेवा आणि सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतील.

सायंकाळी 5.30 वाजता पालकमंत्री श्री. मुश्रीफ हे *शासकीय विश्रामगृह येथे* नागरिकांच्या भेटीगाठी घेणार असून त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळावा कार्यक्रमास उपस्थित राहतील. रात्री रेल्वेमार्गे मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. जिल्ह्यातील विविध विकासकामे, कृषी क्षेत्राची पूर्वतयारी, आरोग्य सेवा आणि नागरिकांच्या समस्या याबाबत पालकमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

स्टेट बँकेत सुरक्षारक्षकाकडून चुकून गोळीबार; एक जण जखमी

Next Post

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

Next Post
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add