Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्टेट बँकेत सुरक्षारक्षकाकडून चुकून गोळीबार; एक जण जखमी

team by team
June 4, 2026
in क्राईम
0
स्टेट बँकेत सुरक्षारक्षकाकडून चुकून गोळीबार; एक जण जखमी

नंदुरबार | प्रतिनिधी

शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळ बुधवारी सायंकाळी एटीएममध्ये रोख रक्कम भरण्यासाठी आलेल्या कॅश व्हॅनच्या सुरक्षारक्षकाकडून चुकून गोळी सुटल्याची घटना घडली. गोळी फरशीवर आदळल्याने उडालेल्या तुकड्यांमुळे एका बँक कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

माहितीनुसार, स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत रोख रक्कम पोहोचविण्यासाठी कॅश व्हॅन आली होती. रोकड उतरविण्याची प्रक्रिया सुरू असताना सुरक्षारक्षकाच्या बंदुकीतून अचानक एक राऊंड फायर झाला. गोळी थेट फरशीवर आदळल्याने मोठा आवाज झाला आणि फरशीचे तुकडे आसपास उडाले.

या घटनेत संजय दगाजी गायकवाड (वय ४३, रा. उमर्दे खुर्द, ता. नंदुरबार) हे जखमी झाले. फरशीचे तुकडे लागल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. प्राथमिक तपासात हा प्रकार बंदुकीतून चुकून गोळी सुटल्यामुळे घडल्याचे समोर आले असून नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे.

गजबजलेल्या बँक परिसरात घडलेल्या या घटनेमुळे काही काळ नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. मात्र पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्र एसटीच्या दोन बसांची भीषण समोरासमोर धडक; ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, ४२ जखमी

Next Post

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

Next Post
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add