Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

team by team
April 30, 2026
in क्राईम
0
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

नंदुरबार | प्रतिनिधी

शाहादा तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना तीन जणांना रंगेहात पकडल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे पंचायत समिती व समाजकल्याण विभागातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास योजनेअंतर्गत कामासंदर्भात प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.

त्यानुसार सापळा रचून मंगळवारी (दि. २९ एप्रिल) शाहादा येथे कारवाई करण्यात आली. या कारवाईत २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना

* भूपेंद्र सरदारसिंग राठोड (ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, पंचायत समिती, शाहादा)
* रमेश मनसाराम बागुल (वरिष्ठ सहायक, समाजकल्याण विभाग)
* चंद्रेश जगजीवनदास शाह (सहाय्यक लेखा अधिकारी, समाजकल्याण विभाग)

यांना ताब्यात घेण्यात आले.

प्रकरणी शाहादा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईमुळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये खळबळ उडाली असून “लाचखोरीविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल” असा इशारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी कोणी लाच मागितल्यास नागरिकांनी त्वरित तक्रार करावी, असे आवाहनही विभागाकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

Next Post

नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा उद्रेक; तीन पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह

Next Post
नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा उद्रेक; तीन पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह

नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा उद्रेक; तीन पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add