धडगांव | प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील उमराणीचा बारीपाडा शिवारात पोलीसांनी धाड टाकुन ४ जणांच्या शेतात लागवड केलेली ७ लाख ५१ हजार ४४० रूपये किंमतीचे ३ क्विंटल ७५ किलो ७२० ग्रॅम वजनाचे एकुण १ हजार २३ गांजाची झाडे जप्त केली असुन याप्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी.आर.औताडे यांना धडगाव तालुक्यात उमराणीचा बारीपाडा शिवारात २ ते ३ शेतांमध्ये गांजा हा अमली पदार्थाची बेकायदेशीरित्या लागवड केली असल्याची बातमी मिळाल्याने पथकाने त्या ठिकाणी जावुन पाहणी केली असता, सरदार शंकर पावरा , अनिल शंकर पावरा , भाईदास डोंगरसिंग पावरा , जयसिंग शंकर पावरा यांच्या शेतात ७ लाख ५१ हजार ४४० रूपये किंमतीचे ३ क्विंटल ७५ किलो ७२० ग्रॅम वजनाचे एकुण १०२३ गांजा पदार्थाचे झाडे जप्त लागवड केलेली दिसुन आली.पोलीसांनी ही झाडे जप्त केली असुन सरदार शंकर पावरा , अनिल शंकर पावरा , भाईदास डोंगरसिंग पावरा , जयसिंग शंकर पावरा सर्व रा. उमराणीचा बारीपाडा ता.धडगांव यांच्या विरूध्द पोसई राहुन शालीग्राम भदाणे यांच्या फिर्यादीवरून धडगांव पोलीस ठाण्यात एन . डी . पी . एस कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई राहुल भदाणे , हेड कॉन्स्टेबल राजेंद्र जाधव , जयेश गावीत , पोना शशिकांत वसईकर , पोकॉ हिरालाल सोनवणे , रितेश बेलेकर, विनोद पाटील , राजेंद्र चोरमले , गणेश मराठे , स्वप्निल गोसावी , दिपक वारुळे , अशोक पाडवी यांच्या पथकाने केली .








