आदिवासी जिल्ह्यातील ग्रामीण भागात शासनाच्या योजना राबविण्यात यंत्रणा कमी पडतेय. दर्जेदार व गतीने विकास कामे होत नसल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. याबाबत उद्या दि. २२ रोजी होणार्या आढावा बैठकीत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पंचायत राज समितीचे प्रमुख आ.संजय रायमुलकर यांनी दिली.
विधिमंडळ पंचायत राज समितीच्या नंदुरबार जिल्हा दौर्याच्या दुसर्या दिवशी आज समितीने तीन पथकांद्वारे जिल्ह्यातील सहा तालुक्यांची पाहणी करत झाडाझडती घेतली. या भेटीदरम्यान कुठे आंदोलन तर कुठे पारंपारीक आदिवासी नृत्याच्या ठेक्यावर समितीचे स्वागत करण्यात आल्याचे दिसून आले.
पंचायत राज समितीचे प्रमुख संजय रायमुलकर यांच्या पथकाने आज नवापूर तालुक्यात विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. नवापूर पंचायत समितीत बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पाहणीदरम्यान आलेल्या अनुभवांचे कथन केले. यावेळी श्री.रायमुलकर म्हणाले, नंदुरबार हा आदिवासी जिल्हा आहे. याठिकाणी कर्मचार्यांना काम करण्यासाठी विशेष भत्ता दिला जातो. गोरगरीब नागरिकांची ज्याप्रकारे सेवा-सुविधा दिली पाहिजे त्या प्रकारे दिली जात नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. याबाबत आम्ही उद्याच्या आढावा बैठकीत याबाबत चर्चा करून संबंधित अधिकार्यांना तसे आदेश देणार असल्याचे सांगितले.
पंचायत राज समितीच्या शहादा, धडगावमधील आमदारांच्या पथकाच्या भेटीदरम्यान पिंगाणे ग्रामस्थांनी शहादा विश्रामगृहाबाहेर ठिय्या देत रस्ता अडवला. या गावकर्यांच्या घरकुल आणि इतर समस्या आंदोलन करुनही सुटत नसल्याने या गावातील शेकडो नागरीकांनी थेट समितीसमोर आंदोलन करत आपले गार्हाणे मांडून समितीला थेट पाहणीसाठी गावात नेले. यावेळी समितीने गावातील समस्या जाणून घेतल्या. नवापूर पथकाने देखील विविध ग्रामपंचायतींची झाडाझडती, आरोग्य केंद्रांची तपासणी करत नवापूरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे पारंपारीक आदिवासी नृत्यांच्या तालावर स्वागत करण्यात आले. दरम्यान आज दुसर्या दिवशीच्या पाहणी दौर्यानंतर पंचायती राज समिती कोणावर कारवाईचा बडगा उचलते का याकडे सार्यांचे लक्ष लागून आहे. दुसर्या दिवशीच्या पाहणी दौर्यात अनेक ठिकाणी शासनाच्या योजना पाहिजेत अशा राबवले गेले नसल्याचे समितीच्या निदर्शनात आल्याचे खुद्द अध्यक्षांनीच मान्य केले आहे.