नंदुरबार| प्रतिनिधी
शहादा शहरात ईदगाह करीता मुस्लिम बांधवांना जागा उपलब्ध करून देण्याची मागणीसाठी राष्ट्रवादीचे शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांची भेट घेलली.नगरपालिकेने आरक्षित केलेल्या भुखंडाला अधिग्रहीत करण्याचे जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या नगरसेवक ऍड.दानिश पठाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांना भेटीप्रसंगी शहादा शहरात ईदगाह करीता मुस्लिम बांधवांना जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. त्याप्रसंगी अजित पवार मार्गी लावलेल्या कब्रस्थानच्या जागेचा विषय निघाला आणि नगरपालिकेने आरक्षित केलेल्या भुखंडाला अधिग्रहीत करण्याचे जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, ऍड.दानिश पठाण, शांतीलाल साळी,सुरेंद्र कुवर,माधवराव पाटील,जि.प.सदस्य मोहन शेवाळे, अमृत लोहार राजेंद्र बाविस्कर, सुदाम पाटील, सिताराम पावरा, संजय खंदारे,आदी उपस्थीत होते.








