नंदुरबार l प्रतिनिधी
ग्रामीण भागातील स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेकडो ग्रामस्थ शिवसेनेत दाखल झाले आहेत. शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांचे स्वागत केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी कृष्णदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी नंदुरबार, शहादा परिसरातील असंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी कृष्णदास पाटील म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काही अडचणी निर्माण होत्या. राज्यात शिवसेनेचे सरकार असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील अशी आशा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निर्णयानुसार आज शिवसेनेत प्रवेश करण्यात आला आहे.
उद्धव पाटील,जीवन पाटील, मनोज पाटील, गोरख पाटील, वसंत पाटील,अर्जुन पाटील, छोटू पाटील, सुरेश पाटील,रवींद्र पाटील, संजय पाटील, ईश्वर सोनवणे, कृष्णदास पाटील, हरी पाटील,अनिल पाटील, सखाराम भिल,दिलवरसिंग भिल यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांचे स्वागत माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
याप्रसंगी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक दीपक दिघे, विद्यमान नगरसेवक कुणाल वसावे, शिवसेनेचे कार्यकर्ते विजय यादव माळी,अतुल पाटील,फारूख मेमन,फरीद मिस्तरी आदी उपस्थित होते.








