नंदुरबार l प्रतिनिधी-
पथराई तालुका नंदुरबार येथील के.डी.गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शरद पाटील होते तर प्रमुख वक्ते म्हणून ॲड.किशोर चव्हाण हे उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रतीक पावरा, विरेन वळवी, रोहित राऊत, हेमंत रणदिवे, चिन्मय पाटील व सागर नाईक या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रमुख वक्ते ॲड.किशोर चव्हाण यांनी आपल्या भाषणातून ” घराघरात जिजाऊ निर्माण झाल्यात तर घराघरात शिवराय जन्माला येतील आणि शिवराय जन्माला आले तर स्वराज्याचे सुराज्य होईल.’ असे विचार मांडले. तसेच स्वामी विवेकानंदांचे विचार हे शाश्वत असून ते सतत समाजाला, राष्ट्राला प्रेरणा देत राहतील असे सांगितले.
प्राचार्य शरद पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून आज शिवरायांचे विचार जन्मले पाहिजेत असे सांगितले तसेच स्वामी विवेकानंदांचे जीवन प्रसंग सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन प्रा.विजय काळे यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन महेंद्र बांगर, प्रा. विजय काळे, शुभांगी पाटील यांनी केले.









