Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गावगुंडांचा आका कोण,मुख्य सुत्रधारालाही अटक करा, माजी आ.शिरीष चौधरी यांची मागणी

team by team
January 14, 2026
in राजकीय
0
गावगुंडांचा आका कोण,मुख्य सुत्रधारालाही अटक करा, माजी आ.शिरीष चौधरी यांची मागणी

नंदुरबार | प्रतिनिधी –

नंदुरबार शहरात दहशत माजविणार्‍या गावगुंडांचा बंदोबस्त करण्यात येवून त्यांना खतपाणी घालणार्‍या त्यांच्या मुख्य सुत्रधारालाही अटक करण्यात यावी, अशी मागणी माजी आ.शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केली.
श्री.चौधरी म्हणाले, दि.१० जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत माझा मुलगा प्रथमेश चौधरी याला उपनगराध्यक्ष पद मिळाले. त्यामुळे विजयी मिरवणूक काढण्यात आली. परंतू शहरातील जळका बाजार परिसरात काही गावगुंड तथा समाजकंटकांनी मिरवणुकीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर मर्डरच्या केसेस आहेत, अवैध धंदे चालवणारे लोक आहेत, काहींवर नागरिकांच्या जागा हडप करण्याच्या केसेस आहेत. काहींनी दुकानांवर कब्जा केला आहे. त्या परिसरात हे लोक नेहमी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. असे २०-२५ गुंड आहेत. ते कुठल्याही पक्षाचे नाहीत, ते फक्त त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी अशी कामे करतात. मात्र, माझा मुलगा पंचवीस वर्षाचा असताना उपनगराध्यक्ष झाला हे त्यांना सहन झालेले नाही. अशा गावगुंडांनी परवा रात्री आम्ही झोपलेले असतांना आमच्या घरावर हल्ला करुन घर जाळण्यासह आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

गाड्यांना पेट्रोल बॉम्बने जाळण्याचा प्रयत्न केला. एका आमदाराच्या घरावर अशाप्रकारे गावगुंडांकडून हल्ला होत असेल तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल उपस्थित करत अशा गावगुंडांचा बंदोबस्त करण्यात यावा व त्यांना खतपाणी घालणार्‍या मुख्य सुत्रधारालाही अटक करण्यात यावी. या गावगुंडांच्या मोबाईलचे तसेच अधिकार्‍यांना कोणी कोणी फोन केले त्याचा संपुर्ण रेकॉर्ड पोलीसांनी तपासावा, तसे केल्यास या गावगुंडांचा सुत्रधार कोण आहे, हे निदर्शनास येईल, असेही श्री.चौधरी यांनी सांगितले.

आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारण ऍस्ट्रासिटी दाखल करणे आता नवीन राहिलेले नाही. ती महिला कोकणी हिलला राहते, तीच्या आमचा काय संबंध? आम्ही गुन्हेगार असलो तर चौकशी करा. मात्र, जे गावगुंंड विविध गुन्हयांमध्ये जेलमध्ये राहून आले आहेत, त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही श्री.चौधरी यांनी केली. यावेळी श्री.चौधरी यांनी प्रोजेक्टरवर त्यांच्या घरावर कशाप्रकारे हल्ला करण्यात आला त्याचे सीसीटीव्ही फुटेजही दाखविले. यावेळी उद्योगपती डॉ.रविंद्र चौधरी, नगरसेवक किरण रघुवंशी, प्रेम सोनार, भरत चौधरी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

सैनिकी विद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊंना अभिवादन

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात माहिती रथयात्रेचे जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते शुभारंभ

Next Post
नंदुरबार जिल्ह्यात माहिती रथयात्रेचे जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते शुभारंभ

नंदुरबार जिल्ह्यात माहिती रथयात्रेचे जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add