नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस सतत सुरू असून आपल्या मार्फत महसूल तसेच कृषी विभागास पिकांचे पंचनामे करून पिक आणेवारी ५० टक्के आत लावण्यात यावी व विमा कंपनीस अवगत करणेबाबत तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबतचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी यांना दिले यावेळी
सागर इंदानी, गजानन पाटील, सुनील पाटील, सचिन पाटील, दुर्गेश पाटील, प्रवीण पाटील, रोहिदास पाटील, महेंद्र गिरासे, नवल गिरासे, विजय पाटील, सागर पाटील, प्रदीप पाटील, नवल पाटील आदी शेतकऱ्यासह रयत शेतकरी संघटना यांनी दिले. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी बांधव असुन, चालू वर्षी सन २०२४-२५ या वर्षात अतिरीक्त पावसामुळे कापसु, सोयाबीन, पपई, मिरची, केळी,मका, बाजरी, ज्वारी यासह सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले असून संपूर्ण जिल्ह्यात पपई या पिकावर डाऊणी रोग तसेच व्हायरस या रोगाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणावर नुकसान दिसून येत असल्याने पपई या पिकावर स्थानिक नैसर्गीक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत फळ पिकाचा लाभ मिळवून देण्यात यावा.
तसेच शेतक-याचे कापसासह सर्वच पिकांच्या उत्पन्नात मोठी येणार असल्याने पिक आणेवारी ही ५०% च्या आत लावणेबाबत जिल्ह्यातील विमा कंपनी तसेच कृषी विभाग, महसूल विभाग यांना त्वरीत पंचनामा आदेश देवून याबाबत शासनास योग्य तो पाठपुरावा करून ओला दुष्काळ जाहीर करणे तसेच पिक विमा कंपनी यांना पंचनाम्याचे आदेश देवून पिक विमाचा लाभ कसा शेतक-यांना कसा मिळवून देता येईल याबाबत आपल्या मार्फत प्रयत्न करावे.
या वर्षी नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसामुळे, वादळी वा-यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावून घेतला आहे त्या नुकसानाची पंचनामे येत्या दोन दिवसात सुरू करावे. पंचमी पंचनामे तातडीने करण्यात आले नाही तर नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून शासनाविरोधात रयत शेतकरी संघटना नंदुरबार यांच्या मार्फत रास्तारोको आंदोलन करणार असून याची आपण नोंद घ्यावी व आमच्या शेतक-यांना चिंता मुक्त करावी ही नम्र विंनती.








