नंदुरबार l प्रतिनिधी-
दिवंगत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जळगावच्या नोबेल फाउंडेशन,नोबेल विज्ञानप्रसारक बहुउद्देशीय संस्था व अमळनेरच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलतर्फे नुकतीच राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.यामध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या नोबेल विज्ञान प्रतिभा पुरस्कारासाठी नंदुरबार येथील समुत्कर्ष बहुउद्देशीय संस्थेचे संचालक ललित महाजन यांची निवड करण्यात आली आहे.
विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रचार व प्रसारासाठी कार्य करीत असणाऱ्या संस्था, शिक्षक व विद्यार्थ्यांना दरवर्षी राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार देवून गौरविण्यात येते. यासाठी पुरस्काराने नीरज अग्रवाल, डॉ.प्रमोद माहुलीकर, डॉ.संजय शेखावत, जामनेर येथील पोदार जिनियस इंटरनॅशनल स्कूलचे सहकार्य लाभते. विज्ञान पुरस्कार संस्था गटासाठी २०२५ या वर्षासाठी नोबेल विज्ञान पुरस्कार संस्था गटासाठी जळगाव येथील ‘योगी’, अमळनेर तालुक्यातील मिलके चलो असोसिएशनची निवड झाली आहे. डॉ.सी.व्ही. रमण विज्ञान शिक्षक पुरस्कारासाठी विवेकानंद प्रतिष्ठानचे विज्ञान शिक्षक उमेश इंगळे, वाळवा तालुक्यातील बोरगाव हायस्कूलचे शिक्षक दीपक चौधरी यांची निवड झाली.
उपक्रम प्रकल्प, तसेच विज्ञानातील यशाबद्दल हिंगणघाट येथील अथर्व जनईकर यांची राज्यस्तरीय डॉ. एपीजे अब्दुल कलाम बालवैज्ञानिक पुरस्कार तर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या नोबेल विज्ञान प्रतिभा पुरस्कारासाठी नंदुरबार येथील समुत्कर्षचे संचालक ललित महाजन यांची निवड झाली.
यांनी केली पुरस्कारार्थींची निवड
या पुरस्कारार्थींची निवड पुरस्कार समिती अध्यक्ष माजी कुलगुरू डॉ.प्रमोद माहुलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.लवकरच या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचे नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांनी सांगितले.








