नंदुरबार l प्रतिनिधी-
सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबारच्या वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत नंदुरबार शहरातील नमस्कार कॉलनी येथे सुमारे 1 कोटी रुपये खर्चाच्या सामाजिक सभागृह व डोमच्या बांधकामाचा शुभारंभ माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावीत यांच्या हस्ते करण्यात आला असून त्याचा भूमिपूजन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
उद्योजक नितेश अग्रवाल, शितल पटेल, माजी नगरसेवक आनंदभाऊ माळी, लक्ष्मण माळी, संतोष वसईकर, संभाजी माळी, मांगू माळी, अक्षय माळी, दिनेश माळी, दादा माळी, डॉ. वसंत शंकर चौधरी सखाराम गिरधर पाटील, उमेश विक्रम राजपुत सुनिल शिवदास पाटील, चंद्रशेखर धामणे, पराग जयवंत पोळ, बी.एस पाटील यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
नमस्कार कॉलनीतील सभागृह आणि डोम बांधणीचे बहुप्रतिक्षित काम डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यामुळे गतिमान झाल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी अत्यंत समाधान व्यक्त केले. दरम्यान, जिल्ह्याच्या विविध भागातील विकास कामांप्रमाणेच शहरातील विकास कामाला सुद्धा वेळोवेळी न्याय देण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. कोणताही भेद न करता प्रत्येक समाजासाठी समाज मंदिर असो किंवा तत्सम काम असो निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरातील रस्ते, ओपन स्पेस चा विकास, उद्यान वगैरे माध्यमातून सुशोभीकरण तसेच पाणी आणि विजेच्या समस्या सोडवण्यावर आपला यापुढे भर राहणार आहे असे डॉक्टर विजयकुमार गावित यांनी याप्रसंगी सांगितले. रोशनी राजपूत यांनी सर्व उपस्थितांच्या वतीने डॉक्टर विजयकुमार गावित यांचे आभार मानून स्थानिक समस्या आणि अपेक्षा सांगणारे मनोगत व्यक्त केले. नमस्कार कॉलनी येथील पद्मा चौधरी, अलका पटेल, सीमा पाटील, पद्मा पाटील, विमल पाटील, हिमांगी पाटील, शैला पाटील, कमलबेन चौधरी , ज्योती पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.