नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील एक उपक्रमशील युवा कार्यकर्ते म्हणून सर्व परिचित असलेले माजी नगरसेवक दिलीप राघो बडगुजर यांची अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे .
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीची अंमळनेर येथे बडगुजर समाज मंगल कार्यालयात नवनियुक्त कार्यकारिणीविषयी नुकतीच महत्त्वपूर्ण सभा संपन्न झाली . मावळते अध्यक्ष माधवराव जानकीराम बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सर्वसंमतीने नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली . यात अध्यक्षपदी आनंदा धोंडू सूर्यवंशी धुळे , उपाध्यक्षपदी दिलीप राघो बडगुजर नंदुरबार , सचिव हिरालाल रघुनाथ बडगुजर , सहसचिव भालचंद्र विठ्ठलराव साळुंखे , खजिनदार प्रकाश धुडकु बडगुजर , संघटक सुधीर तुळशीराम बडगुजर अशी निवड घोषित करण्यात आली . सचिव राजेंद्र बडगुजर यांनी प्रास्तविक तर ईश्वर बडगुजर यांनी आभार मानले . उपाध्यक्षपदी निवड झालेले दिलीप बडगुजर हे 2003 पासून 2019 असे सलग 16 वर्षे नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळच्या अध्यक्षपदी होते . हे पद भूषवतांना समाजातील युवकांना व समाजबांधवांना संघटित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले . तसेच अखिल भारतीय महासमितीचे ते 2011 पासून कार्यकारणी सदस्य , अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती अध्यक्ष म्हणून दहा वर्ष कार्यरत होते व बडगुजर शिक्षण संस्था धुळे बोर्डिंग येथे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत . विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे .








