Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विविध राजकीय पक्षातील नेते सेनेत प्रवेश करणार: डॉ.विक्रांत मोरे

team by team
October 18, 2021
in राजकीय
0
विविध राजकीय पक्षातील नेते सेनेत प्रवेश करणार: डॉ.विक्रांत मोरे
नवापूर l प्रतिनिधी-
शिवसेनेची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी  विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. नवापूर परिसरातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे यांनी दिली.
शहरात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली  पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे म्हणाले, कार्यकर्त्यांनी तालुक्‍यात अधिकाधिक संघटन मजबूत करावे. प्रत्येक गाव पातळीवर शिवसेनेची शाखा उघडण्यात येईल आणि त्या माध्यमातून जनतेचे प्रश्न कार्यकर्त्यांनी मार्गी लावावेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियोजनामुळे आज कोरोना संसर्गजन्य परिस्थिती आटोक्यात आलेली आहे. नागरिकांनीही शासनाच्या नियमावलीचे पालन करावे.
बैठकीला माजी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख मनोज चव्हाण, उपजिल्हाप्रमुख गोटू पाटील, तालुकाप्रमुख रमेश गावित,देवका पाडवी, युवासेनेचे नरेंद्र गावित, राहुल टिभे, कल्पित नाईक तसेच आजी माजी पदाधिकारी, शाखाप्रमुख, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल वारुडे यांनी केले व आभार मनोज बोरसे यांनी व्यक्त केले.
लोकं भाजपला कंटाळली
दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेल्या आहेत. त्यात महागाईचा भडका होत आहे निवडणुकीपूर्वीच्या घोषणांच्या भाजप नेत्यांना विसर पडून गेला आहे. त्यामुळे लोक भाजपला कंटाळलेली आहेत. नवापूर परिसरातील राजकीय कार्यकर्ते शिवसेनेच्या वाटेवर असून लवकरच त्यांच्या प्रवेश होणार असल्याचे बैठकीत जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांनी सांगितले.
बातमी शेअर करा
Previous Post

राज्यातील चित्रपटगृह चालकांनी योग्य त्या सुरक्षा तपासण्या करूनच चित्रपटगृहे सुरू करावीत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या उपाध्यक्षपदी दिलीप बडगुजर यांची निवड

Next Post

अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या उपाध्यक्षपदी दिलीप बडगुजर यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add