नंदुरबार l प्रतिनिधी
के.डी.गावीत सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय पथराई येथे राजर्षी शाहूमहाराज जयंती अर्थातच सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शरद पाटील व प्रमुख पाहुणे संदीप ईशी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर सुशील नाईक,शिवम पानपाटील,रोहित राऊत,मुकुंदराज परमार,आयुष नाईक, खुशाल पाटील, सौरव जगताप,शुभम वसावे इ. विद्यार्थ्यांनी शाहूमहाराजांचे विविध क्षेत्रात केलेले कार्य भाषणातून मांडले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी संदीप ईशी यांनी शाहू महाराजांच्या बालपणातील प्रसंग, सामाजिक, शैक्षणिक, व्यापार,उद्योग, शेती इ.क्षेत्रात केलेले कार्य सविस्तरपणे मांडले.योगेश हिरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
शरद पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून शाहूमहाराजांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला.
शाळेत राजर्षी शाहूमहाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे तसेच त्यांच्या कार्याबद्दल संकलित माहितीचे प्रदर्शन भरण्यात आले होते.तसेच महाराजांच्या जीवनावर आधारित सामान्यज्ञान परीक्षेचेही आयोजन करण्यात आले होते.त्यात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रजनी करेले यांनी केले तर आभार संदानशिव यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन प्रल्हाद संदानशिव, श्रीमती रजनी करेले,आणि काशिनाथ सूर्यवंशी यांनी केले.