Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बेकायदेशीररित्या अमली पदार्थाची वाहतूक, 54 किलो गांजा जप्त, चौघांना केली अटक

team by team
June 28, 2025
in क्राईम
0
बेकायदेशीररित्या अमली पदार्थाची वाहतूक, 54 किलो गांजा जप्त, चौघांना केली अटक

बेकायदेशीररित्या अमली पदार्थाची वाहतूक, 54 किलो गांजा जप्त, चौघांना केली अटक

नंदुरबार l प्रतिनिधी

बेकायदेशीररित्या अंमली पदार्थ विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत एकुण 12 लाख 66 हजार 780 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे

दिनांक 27 जुलै 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनिय माहिती मिळाली की, शहादा पोलीस ठाणे हद्दीतील असलोद ते मलगाव दरम्यान एक इसम स्वतःचे आर्थिक फायदयसाठी बेकायदेशीररित्या मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारे गुंगीकारक सुका गांजाची विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करणार आहे, अशी खात्रिशीर माहिती मिळालेवरुन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकास सोबत शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी निलेश देसले यांना याबाबत माहिती कळवून कारवाई करण्यास सांगितले.

मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे पोलीस पथके हे असलोद ते मलगाव दरम्यान दुधखेडा गावाचे पुढे रस्त्यावर सापळा लावुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असतांना मलगाव मानमोडया गावाकडून तीन मोटारसायकली येतांना दिसल्या. सदर मोटारसायकलींना हात देऊन थांबविण्यात आले. सदर मोटारसायकल वरील गुजाऱ्या मंसाराम पावरा रा.सटीपाणी जामजिरा, ता. शिरपुर जि. धुळे, शिवदास विरसिंग पावरा रा.गदडदेव, ता.शिरपुर जि.धुळे, गणेश विरसिंग पावरा रा. गदडदेव, ता.शिरपुर जि. धुळे, नंदिलाल रोहिदास पावरा रा. आंबाफाटा ता. शिरपुर, जि. धुळे असे सांगितले. त्यांना त्यांचे मोटारसायकलवर असलेल्या दोन पांढऱ्या रंगाच्या प्लास्टीकच्या गोण्यांमध्ये काय आहे बाबत विचारणा करता ते घाबरुन जाऊन उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यावेळी त्यांच्यावर संशय अधिक बळावल्याने त्यांचे वाहनावरील पांढऱ्या गोण्यांची तपासणी करता त्यामध्ये बेकायदेशीररित्या अंबुस उग्र वासाचा सुका गांजा पथकास मिळुन आल्याने सदर इसमांना लागलीच पोलीस पथकाने ताब्यात घेतले.

 

सदर इसमांकडुन एकुण 53 किलो 330 ग्रॅम वजनाचा सुका गांजा (अंमली पदार्थ) व 3 वाहने असा एकुण 12 लाख 66 हजार 780 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याअन्वये वर 4 आरोपींविरुध्द शहादा पोलीस ठाणे येथे गु.र.नं.- 381/2025 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-1985 चे कलम 8 (क), 20, 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले, स्थागुशा पोउपनि मुकेश पवार, शहादा पोलीस ठाण्याचे पोउपनि छगन चव्हाण, स्थागुशा स्टाफ पोहेकॉ मुकेश तावडे, विशाल नागरे, बापू बागुल, पोना विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, सचिन वसावे, पोशि अभय राजपुत, भरत उगले अशांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा, युवक युवती तसेच विद्यार्थ्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण

Next Post

नंदुरबार तालुक्यातील दरोड्यातील चौघांना अटक

Next Post
नंदुरबार तालुक्यातील दरोड्यातील चौघांना अटक

नंदुरबार तालुक्यातील दरोड्यातील चौघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add