भरडधान्य खरेदी केंद्राचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन
नंदुरबार l प्रतिनिधी
शासकीय किमान आधारभुत किंमत योजनेअंतर्गत रब्बी भरडधान्य खरेदी केंद्राचे उदघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.१ हजार ५०० क्विंटल धान्य खरेदीचे उद्दिष्ट असून ११४ शेतकऱ्यांनी योजनेसाठी नोंदणी केले आहे.
नंदुरबार येथील शासकीय गोडावुनमध्ये शुक्रवार (दि.30) रोजी शासकीय बिगर आदिवासी क्षेत्रातील किमान आधारभुत किंमत योजनेअंतर्गत रब्बी भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत ज्वारीला प्रति विंकटल 3 हजार 371 तर मक्याला 2 हजार 225 भाव मिळणार आहे.१ हजार ५०० क्विंटल धान्य खरेदीचे उद्दिष्ट असून ११४ शेतकऱ्यांनी योजनेसाठी नोंदणी केली.
शुक्रवारी खरेदी केंद्राची उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख ॲड.राम रघुवंशी यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले. प्रास्ताविक शेतकी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील यांनी केले.कार्यक्रमाप्रसंगी तहसिलदार मिलिंद कुलथे, नायब तहसिलदार प्रांजल पाटील, जिल्हा मार्केटींग अधिकारी राजेंद्र इंगळे, मार्केटींग फेडरेशनचे सजन पाटील मार्केट कमेची सभापती संध्या पाटील, शेतकरी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील,गोदाम व्यवस्थापक ऋषिकेश तावरे, उपस्थित होते.
ज्वारी विक्रीसाठी आणतांना कोरडी व स्वच्छ एफ.ए.क्यु दर्जाची आणावी (ओलावा) आद्रता 14 टक्के पेक्षा कमी पाहिजे. खरेदी केलेल्या मालाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनआईन जमा होणार आहे.
यावेळी माजी सभापती विक्रमसिंग वळवी,माजी जि.प सदस्य देवमन पवार, माजी नगरसेवक गजेंद्र शिंपी, दिनेश पाटील, गजानान पाटील,राजेश पाडवी, संघाचे संचालक भरतसिंग राजपुत पंडीतराव पाटील, वंसतराव देसले, खुशाल पाटील, प्रभाकर पाटील, उध्दव पटेल, दिपक पाटील, गोकुळ नागरे, आनंदा पाटील व्यवस्थापक कृष्णा पाटील, चंद्रकांत मराठे, सतिष पाटील, जगन खेडकर, शत्रुघ्न भिल,प्रशांत पवार, चंद्रकांत पाटील, विरेद्र पवार व शेतकरी उपस्थित होते.