नंदुरबार l प्रतिनिधी
भालेर,वडवद ता. नंदुरबार ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली असून सरपंचपदी कविता चंद्रशेखर पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली.
निवडणूक अधिकारी म्हणून खोंडामळीचे मंडल अधिकारी अनिल दौलत पानपाटील यांनी काम पाहिले त्यांना ग्रामपंचायत अधिकारी किशोर शिरसाठ, तलाठी नरेंद्र महाले यांनी निवडणूक कामी मदत केली. भालेर -वडवद ग्रुप ग्रामपंचायतची २२-३-१९५६ साली स्थापना झाली.
भालेर-वडवद ग्रुप ग्रामपंचायतीची निवड २३ ऑक्टोंबर २०२३ रोजी झाली. यावेळी वैशाली दिनेश पाटील, गजानन भिका पाटील, सिंधुबाई हिरामण पाटील, दिपाली पावभा भिल,पंडित अभेसिंग भिल, शोभाबाई प्रल्हाद पाटील, कविता चंद्रशेखर पाटील, जागृती राहुल आधी सदस्या निवडून आले. पाटील, पुरुषोत्तम कैलास पाटील, सुमन वल्लभ भिल. प्रथम अडीच वर्षासाठी वैशाली दिनेश पाटील या बिनविरोध सरपंचपदी निवडून आल्या होत्या.