नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याने शोक सभा घेऊन मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.
मदर टेरेसा हायस्कुल च्या प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली शोक सभा घेऊन मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉ मोरे म्हणाले, पाकिस्तानकडून आतंकवादी हमला होणे हे दुर्दैवी आहे. या भ्याड हल्ल्याचा पक्षाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. यानंतर 2 मिनिटे मौन बाळगत श्रद्धांजली वाहण्यात आली.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मोंटू जैन,जिल्हा सरचिटणिस मधूकर पाटील,नंदुरबार तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा वैशाली मनोज चौधरी, ज्येष्ठ़ पदाधिकारी जगदीशकाका जायस्वाल,ॲड प्रकाश भोई,अनिल चौधरी, अजहर मिया जहांगिरदार, मुजाईद सैय्यद, इमरान काकर,अदनान मेमन, सुनिता शिंपी, प्रतिभा कुळकर्णी, युनुसभाई (करणखेडा),,धनराज बच्छाव, राजा ठाकरे,सागर पाटील, सतिष मंगळे, अनिल पगारे,राजु पवार, रमेश सोनवणे, सिकंदर कुरेशी आदी मान्य़वर उपस्थित होते.