नंदुरबार l प्रतिनिधी
महाराणा संग्रामसिंग उर्फ राणा सांगा यांच्याबद्दल संसदेत अपशब्द बोलणार्या समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार रामजीलाल सुमन यांच्या वर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी नंदुरबार जिल्हा सकल राजपूत समाजातर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन संसदभवन सभापती यांना नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, विदेशीय आक्रमणविरोधात लढणारे लडवय्ये महाराणा संग्रामसिंग उर्फ राणा सांगा जे आपला एक हात, एक डोळा, एक पाय गमावून देखील शत्रूसोबत लढले. ऐंशी जखमा शरीरावर झेलून त्यांनी देशासाठी लढा दिला त्यांचे बलिदान देश कसा विसरू शकतो. उदयपुर राजस्थानचे राजा राणा सांगा यांच्याबद्दल बाबर आपल्या आत्मचारित्र्यात देखील लिहून गेला आहे कि, राणा सांगा आपल्या शौर्यामुळे आणि तलवारीच्या सामर्थ्यामुळे अमर झाले. बाबर विरोधात राणा सांगा अखेर पर्यंत लढले.
परंतु काही बाबरची पिलावट महाराणा संग्रामसिंग यांच्याबद्दल संसदेत अपशब्द बोलले. उत्तर प्रदेश समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार रामजीलाल सुमन यांनी दि.२१ मार्च २००२५ रोजी राज्यसभेत महाराणा संग्रामसिंग (राणा सांगा) यांच्या बद्दल अपशब्द बोलले. रामजीलाल सुमन यांच्यावर कठोर कार्यवाही व्हावी. त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी.
त्यांच्यावर राष्ट्रदोहचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा येत्या काळात राजपूत समाजाकडून तीव्र आंदोलन छेळण्यात येईल, असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देतेप्रसंगी शाम राजपूत, मोहिनीराज राजपूत, दिनकर राजपूत, प्रेमचंद राजपूत, सुरजसिंग राजपूत, कांतीलाल राजपूत, डॉ.रामसिंग राजपूत, भोलेसिंग गिरासे, भिमसिंग राजपूत, पवन राजपूत आदींच्या सह्या आहेत.