Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विद्यार्थी हा कुटुंब आणि देशाचा विकास बिंदू- डॉ.विजय पटेल

team by team
March 28, 2025
in सामाजिक
0
विद्यार्थी हा कुटुंब आणि देशाचा विकास बिंदू- डॉ.विजय पटेल

नंदुरबार l प्रतिनिधी

विद्यार्थी हा कुटुंबाचा आणि देशाचा विकास बिंदु असून त्याच्या भविष्याचा मार्गदर्शक हा समाज व शिक्षक आहे. विद्यार्थ्याने कुटुंबाच्या परिस्थितीचा विचार उराशी बाळगला पाहिजे. त्याची आर्थिक स्थिति सुधारणे हे त्याने आज ठरवलेल्या ध्येयावर अवलंबून असून स्वप्न बघातांना मोठी बघा व ती पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केल्यास यश तुमचेच असेल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध शल्य विशारद डॉ. विजय पटेल यांनी केले.

नंदुरबार येथील निव्होप्रेरणा फाउंडेशन पुरस्कृत जीवनशैलीशी ताळमेळ उपक्रमांतर्गत आज दि.२८ मार्च रोजी वि.जा.भ.ज माध्यमिक आश्रमशाळा नांदखरे ता. नंदुरबार येथे नंदुरबार जिल्ह्यातील सुप्रसिद्ध शल्य विशारद डॉ.विजय पटेल यांचे हस्ते विद्यार्थ्यांना आरोग्यकिट वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सौ प्राप्ती पाटील यांनी सांगितले की, मराठी शाळांतून शिक्षण घेणारा विद्यार्थी हा सर्वसामान्य कुटुंबातून येत असतो. त्याच्यासाठी शालेय स्तरावर शिक्षक प्रयत्नशील आहेतच. पण जेव्हा निव्होप्रेरणा फाउंडेशनसारख्या समाजसेवी संस्था यात सहभागी होतात आणि त्यातही डॉ. विजय पटेल यांच्यासारखे नावाजलेले वैद्यकीय व्यावसायिक शाळेला भेट देतात.

तेव्हा खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचे मनोबल वाढीस लागत असल्याचे मनोगत त्यांनी मांडले. निव्होप्रेरणा फाउंडेशन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी राबवत असलेल्या सामाजिक उपक्रमांची सखोल माहिती संस्थेचे व्यवस्थापक ललित विसपुते यांनी दिली. संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध कंठे यांचे उपक्रमासाठी मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आयोजन विभागीय अधिकारी स्वप्नील राजपूत यांनी केले. सूत्रसंचालन भाग्यश्री मोरे यांनी केले. आभार प्रशांत शिंदे यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा रुग्णालयात साजरा करण्यात आला प्रॉमिस डे, कमी वजनाचा बालकांना सुदृढ करण्यात जिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ञांना यश

Next Post

नंदुरबार जिल्हा सकल राजपूत समाजातर्फे खा.रामजीलाल सुमन यांचा तीव्र निषेध मागणी; खासदारकी रद्द करुन कठोर कारवाई व्हावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add