Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराणा संग्रामसिंग यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे खा.रामलाल सुमन यांच्यावर कारवाई करा, नंदुरबार येथे श्री राष्ट्रीय करणी सेनेची प्रशासनाकडे निवेदनातून मागणी

team by team
March 28, 2025
in राजकीय
0
महाराणा संग्रामसिंग यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे खा.रामलाल सुमन यांच्यावर कारवाई करा, नंदुरबार येथे श्री राष्ट्रीय करणी सेनेची प्रशासनाकडे निवेदनातून मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी

वीरशिरोमणी महाराणा प्रताप यांचे आजोबा महाराणा संग्रामसिंग उर्फ राणा सांगा यांच्याविषयी संसदेत आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या समाजवादी पार्टीचे खा.रामलाल सुमन यांच्यावर कठोर कारवाई करुन त्यांची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी नंदुरबार येथील श्री राष्ट्रीय करणी सेना (भारत) यांच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत नंदुरबारचे निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचे आजोबा महाराणा संग्रामसिंग उर्फ राणा सांगा यांच्याबद्दल समाजवादी पार्टीचे राज्यसभा खा.रामलाल सुमन यांनी संसदेत अपशब्द बोलून आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. देशात दिवसेंदिवस महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु शासन व प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. अशा आक्षेपार्ह वक्तव्याच्या कृत्यामुळे शांततेचा भंग होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो.

म्हणून संसदेत महाराणा संग्रामसिंग उर्फ राणा सांगा यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे खा.रामलाल सुमन यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येवून त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी. तसेच खा.रामलाल सुमन यांनी माफी मागावी. तसेच त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा येत्या पंधरा दिवसात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,

असा इशारा श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना (भारत) चे राष्ट्रीय युवा महासचिव राणा मुकेशसिंह राजपूत, करणी सेना युवा शक्तीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जितेंद्रसिंग ऊर्फ पिंटू राजपूत, अखिल भारतीय क्षत्रिय महासभाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष मोहितसिंग राजपूत, क्षत्रिय राजपूत समाज समितीचे अध्यक्ष चेतन राजपूत, अजय राजपूत, पंकज राजपूत, पवन राजपूत, धर्मेंद्र राजपूत, गौरव राजपूत, अर्जुन राजपूत, महेश राजपूत, कैलास राजपूत, सोनु वराडे, बुध्या पवार, जय वळवी, बबलु माळी, मोहन माळी, अर्जुन मराठे, धनु मराठे, पप्पु राजपूत, गुलाबसिंग राजपूत आदींनी निवेदनातून दिला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सोमवारी आभार सभा, आ.चंद्रकांत रघुवंशी,आ.आमश्या पाडवींनी केले उपस्थितीचे आवाहन

Next Post

औद्योगिक विकासाच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनी लाटण्याचा प्रकार, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व शेतकऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add