नंदुरबार l प्रतिनिधी
येथील इंदिरा महिला सहकारी बँकेच्या चेअरमनपदी सौ.कविता मनोज रघुवंशी तर व्हा.चेअरमनपदी ज्योतीदेवी संजय अग्रवाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
इंदिरा महिला सहकारी बँकेच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळ संपल्यामुळे सहाय्यक उपनिबंधक कार्यालयाकडून निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार, गुरुवार दि. २० मार्च रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी इंदिरा बँकेच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. चेअरमनपदासाठी कविता मनोज रघुवंशी यांनी तर व्हा.चेअरमन पदासाठी ज्योतीदेवी संजय अग्रवाल यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले. दाखल नामनिर्देशन पत्रांवर कामकाज करण्यात आले.
चेअरमन व व्हा.चेअरमनपदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे सहाय्यक निबंधक नीरज चौधरी यांनी कविता रघुवंशी यांची चेअरमन तर व्हाईस चेअरमनपदी ज्योतीदेवी अग्रवाल यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.निवड झाल्यानंतर नूतन चेअरमन कविता रघुवंशी आणि व्हा.चेअरमन ज्योतीदेवी अग्रवाल यांच्या सहाय्यक निबंधक नीरज चौधरी,बँक व्यवस्थापक बाळकृष्ण वाणी यांनी सत्कार केला.
यावेळी बँकेच्या संचालक विजया कदमबांडे,विद्या चौधरी,गुलाब जैन, हंसा दवे,विजया पाटील,अर्चना रघुवंशी,छाया शेवाळे,भारजाबाई कोकणी,रमणबाई गिरासे, सुमन पाटील,सुचिता गोसावी उपस्थित होत्या.