नंदुरबार l प्रतिनिधी
शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली असून,त्यांना सदस्यत्वाचे प्रमाणपत्र गुरुवारी देण्यात आले.तर शुक्रवारी सदस्य पदाची शपथ घेतली.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांची विधान परिषद सदस्य म्हणून निवड झालेली आहे. गुरुवार दि.२० मार्च रोजी दुपारी त्यांना विधिमंडळ सचिवालयातील अधिकारी जितेंद्र भोळे यांनी प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी नंदुरबार नगरपरिषदेचे माजी नगरसेवक दीपक दिघे,उद्योजक देवेंद्र जैन यांच्यासह विधिमंडळातील अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी विधिमंडळ सचिवालयातील अधिकारी जितेंद्र भोळे यांच्यासह अधिकाऱ्यांनी रघुवंशींच्या सत्कार केला.