नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील 35 आणि नंदुरबार तालुक्यातील 41 अशा दोन्ही तालुक्यातील एकूण 76 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत 21 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता शहादा व नंदुरबार तहसील कार्यालयात होणार आहे, असे उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन) गोविंदा दाणेज यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
अनुसूचित क्षेत्रातील 563 आणि अनुसूचित क्षेत्राबाहेरील 76 ग्रामपंचायतींसह (एकूण 639) महिला सरपंच पदासाठी आरक्षण सोडत 25 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता बिरसा मुंडा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे काढण्यात येईल.
हे आरक्षण 5 मार्च 2025 ते 4 मार्च 2030 या कालावधीतील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकांसाठी लागू राहील, असेही उपजिल्हाधिकारी गोविंदा दाणेज यांनी कळविले आहे.