Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गुणसंवर्धित तांदळाच्या जनजागृतीसाठी तालुका पातळीवर प्रशिक्षण सुरू

Mahesh Patil by Mahesh Patil
March 19, 2025
in राज्य
0
गुणसंवर्धित तांदळाच्या जनजागृतीसाठी तालुका पातळीवर प्रशिक्षण सुरू

नंदुरबार l प्रतिनिधी

देशभरात वाढत असलेल्या रक्तक्षय (ऍनिमिया) आणि कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी भारत सरकारने गुणसंवर्धित तांदूळ (Fortified Rice) वितरणाचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यात तालुका स्तरावर प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील रेशन दुकान परवानाधारक, महिला बचत गट, अंगणवाडी कर्मचारी आणि लाभार्थी यांना 31 मार्च 2025 पर्यंत प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, मास्टर्स ट्रेनर्स म्हणून विठ्ठल काकडे, सचिन शिंदे आणि हितेश ढाले हे प्रशिक्षण देत आहेत.

*प्रशिक्षणाची सुरुवात*
18 मार्च 2025 रोजी नंदुरबार तहसील कार्यालयात पहिल्या प्रशिक्षण सत्राचे आयोजनाने करण्यात आले. या सत्रात गुणसंवर्धित तांदळात लोह, फोलिक आम्ल आणि व्हिटॅमिन बी-12 असते, ज्यामुळे रक्तक्षयासह कुपोषण दूर होऊन नागरिकांचे आरोग्य सुधारते, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी पॉवर पॉईंट सादरीकरण आणि माहितीपट (व्हिडीओ) च्या माध्यमातून प्रशिक्षण दिले गेले. तसेच सर्व उपस्थितांना व्हाट्स ॲप द्वारे प्रशिक्षण साहित्य पुरविण्यात आले, तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या फेसबुक पेजवरही हे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.

*प्रशिक्षणासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद*
या उपक्रमाला रेशन दुकानदार, अंगणवाडी कर्मचारी आणि आश्रमशाळांचे प्रतिनिधी यांनी मोठा प्रतिसाद दिला. गुणसंवर्धित तांदूळ आरोग्यासाठी लाभदायक असून, याबाबत अधिकाधिक जनजागृती करू, असे उपस्थित प्रशिक्षणार्थींनी आश्वासन दिले.

*तालुका स्तरावर प्रशिक्षणाचे वेळापत्रक*
जिल्ह्यात नवापूर तालुक्यात 19 मार्च रोजी, शहादा तालुक्यात 21 मार्च रोजी, तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यांत 27 मार्च रोजी, तर अक्राणी तालुक्यात 28 मार्च रोजी दुपारी 12:30 ते 2:30 या वेळेत प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकान्वये गणेश मिसाळ यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

श्री.शिव महापुराण महाकथा आयोजन बैठकीत आमदार राजेश पाडवी यांचे मार्गदर्शन

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात सरपंच पदासाठी आरक्षण सोडत 21 व 25 मार्चला

Next Post
नंदुरबार जिल्ह्यात सरपंच पदासाठी आरक्षण सोडत 21 व 25 मार्चला

नंदुरबार जिल्ह्यात सरपंच पदासाठी आरक्षण सोडत 21 व 25 मार्चला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

याहामोगीपाडा व खाकरपानीपाडा येथे त्वरित विजेची सोय करा,शिंदे शिवसेनेची मागणी

याहामोगीपाडा व खाकरपानीपाडा येथे त्वरित विजेची सोय करा,शिंदे शिवसेनेची मागणी

December 18, 2025
खाकीसाठी जिद्दीची धाव; युवा उमेदवारांसाठी भामरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे ऐतिहासिक सराव चाचणी; ६०० हून अधिक तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग

खाकीसाठी जिद्दीची धाव; युवा उमेदवारांसाठी भामरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे ऐतिहासिक सराव चाचणी; ६०० हून अधिक तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग

December 18, 2025
राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत वैष्णवी मानकरला सुवर्णपदक

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत वैष्णवी मानकरला सुवर्णपदक

December 18, 2025
समुद्रावर नंदनगरीचा ठसा! दहा किमी सागरी जलतरणात देव राजपूत राज्यात आठवा

समुद्रावर नंदनगरीचा ठसा! दहा किमी सागरी जलतरणात देव राजपूत राज्यात आठवा

December 18, 2025
नंदुरबारसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यांत सेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, उल्लेखनीय कामगिरीचा नाशिक येथे गौरव

नंदुरबारसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यांत सेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, उल्लेखनीय कामगिरीचा नाशिक येथे गौरव

December 18, 2025
नंदुरबार शहरातील वाढीव व अतिरिक्त घरपट्टीची सक्ती रद्द करा ,उबाठा गटाची मागणी

नंदुरबार शहरातील वाढीव व अतिरिक्त घरपट्टीची सक्ती रद्द करा ,उबाठा गटाची मागणी

December 18, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group