नंदुरबार l प्रतिनिधी
शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर नंदुरबारात समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी आणि एकमेकांना पेढे भरवून जल्लोष केला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शिवसेना संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी विधान परिषदेसाठी प्रबळ दावेदार होते. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री,पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धडगावचा प्रचार सभेत चंद्रकांत रघुवंशी यांना आमदार करण्याचे जाहीर केले होते.दरम्यान,विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यामुळे ती जागा रिक्त झाली होती.
३ आठवड्यांपूर्वीच विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर झाला. त्यात शिवसेनेच्या वाट्याला १ जागा होती. या जागेसाठी अनेक जण इच्छुक होते. शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशींना उमेदवारी दिली. सोमवारी सकाळी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नंदुरबारात सेना भवन परिसरात समर्थकांनी जल्लोशोत्सव साजरा केला.
सकाळी ११ वाजता सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी जमा झाल्यानंतर सेना भवन परिसरात ढोल ताशांच्या गजर अन फटक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्याचप्रमाणे शिवसैनिकांनी एकमेकांना पेढा भरवला. जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी,जि.प माजी अध्यक्ष वकील पाटील,शेतकी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील, माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, माजी सभापती कैलास पाटील, तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव मोरे,माजी जि.प सदस्य देवमन पवार,किरण रघुवंशी, कुणाल वसावे,गजेंद्र शिंपी, रवींद्र पवार,पत्रकार हिरालाल चौधरी,किशोर पाटील, नवीन बिर्ला,मोहितसिंग राजपूत,जगन माळी, किरण चौधरी, विजय माळी यांनी जल्लोशोत्सवात सहभाग घेतला.