नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर शहरात उपचारा दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला होता.संतप्त नातेवाईकांनी डॉक्टर व स्टाफ यांना मारहाण केली करीत हॉस्पिटलची तोडफोड केली होती.याप्रकरणी 6 जणांना अटक केली आहे.
दिनांक 11 माराच 2025 रोजी सकाळचे सुमारास नवापुर शहरातील नोबेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल येथे गुजरात येथील रुग्ण नामे राजुभाई गामीत, रा. सुंदरपूर यांचे छातीत दुखत असल्याने उपचाराकामी दाखल करण्यात आले होते. सदर इसम उपचारादरम्यान मयत झाल्याने त्याचे नातेवाईकांना त्याचा राग आल्याने नातेवाईकांनी नोबेल हॉस्पिटलचे डॉ. अजय कुवर व स्टाफ अशांना मारहाण करत हॉस्पिटलची तोडफोड केली होती.
त्याअन्वये डॉक्टर अजय कुवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नवापुर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 161/2025 भारतीय न्याय संहिता कलम 189(2),352, 351(2) (3),324(4) (5) सह महाराष्ट्र वैदयकीय सेवा व्यक्तींबाबत घडणा-या हिंसक कृत्यांना प्रतिबंध व वैदयकीय सेवा संस्थांच्या मालमत्तेची हानी किंवा नुकसान करण्यास प्रतिबंध अधि. कलम 3 चे उल्लंघन 4 प्रमाणे अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेत नवापुर पोलीस ठाण्याचे प्रभारी शिवाजी बुधवंत यांनी तपासाची चक्रे फिरवित घटनास्थळी असलेल्या सी.सी.टी.व्ही. फुटेजचे मदतीने वर नमुद घटनेतील आरोपींची ओळख पटवून पोउपनिरीक्षक श्री. विशाल सोनवणे व स्टाफ अशांचे मदतीने आरोपींना ताब्यात घेतले. त्यामध्ये रामलाल ईश्वर मावची रा.मु.पो. सुंदरपूर ता. उच्छल जि. तापी, सुनिलभाई कर्माभाई गामीत रा.मु.पो.सुंदरपूर ता.उच्छल जि. तापी, विपूलभाई ईश्वरभाई मावची, रा.मु.पो. सुंदरपूर ता. उच्छल जि. तापी, ओमेशभाई प्रफुलभाई गामीत रा.मु.पो. सुंदरपूर ता. उच्छल जि. तापी चमेलीबेन धर्मेशभाई गामीत रा.मु.पो. सुंदरपूर ता.उच्छल जि. तापी कुसुमबेन ईश्वरभाई मावची, वय- 51 वर्षे, रा.मु.पो. सुंदरपूर ता. उच्छल जि. तापी अशांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली नवापुर पोलीस ठाण्याचे प्रभारी शिवाजी बुधवंत, पोउपनिरीक्षक विशाल सोनवणे, पोहेकॉ दिनेश वसूले, नितीन नाईक, पोशि अतुल पानपाटील, समाधान केंद्रे, दिपक पाटील अशांनी केली आहे.