नंदुरबार l प्रतिनिधी-
स्वच्छता आणि शांतता जिथे जिथे, देवाची वस्ती तिथे तिथे.. हे सूत्र रुजविण्यासाठी आज 2 मार्च रोजी संपूर्ण देशभरात डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा माध्यमातून देशव्यापी स्वच्छता अभियान घेण्यात आले त्यात महाराष्ट्राचे मा आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी कार्यकर्त्यांसमवेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत महाराष्ट्र भूषण पद्मश्री डॉ अप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉ सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून आज 2 मार्च रोजी संपूर्ण देशभरात डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा माध्यमातून हजारो श्री सदस्य स्वच्छता दूत म्हणून प्रत्यक्ष कार्यात उतरले आहेत.
सकाळी साडेआठच्या सुमारास नंदुरबार शहरातील श्री सदस्यांच्या माध्यमातून माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराणा प्रताप चौक परिसरातून स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. या अभियानाच्या माध्यमातून शहरातील जमा केलेला सुका आणि ओला कचरा केवळ गोळा न करतात त्याची योग्यरित्या विल्हेवाट देखील लावली जाणार आहे. या अभियानाबाबत माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी अधिक माहिती दिली आणि उपस्थिताना प्रोत्साहित केले.