नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यात लुपिन ह्युमन वेलफेअर आणि रिसर्च फाऊंडेशन सुधारित कापूस आदर्श पद्धत प्रकल्प राबवत असून प्रकल्पाच्या माध्यमातून गावो गावी कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि प्रत्याक्षित माध्यमातून मोठ्या प्रमाणात माहिती मार्गदर्शन कार्यक्रम सुरू आहे .
प्रकल्पाच्या मार्गदर्शक तत्वा नुसार गट प्रमुख शेतकाऱ्याना एकत्रित करून कोळदा येथील अजित राजपूत यांच्या शेतावर शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते , सदर शेती शाळेत मार्गदर्शक म्हणून कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेष तज्ञ पदमाकर कुंदे यांनी कापूस पिकावर येणारे किडी आणि रोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे निरसन केले . तसेच लुपिन फाउंडेशन वे अविनाश बोरसे पी.यू.व्यवस्थापक , यांनी बीसीआय प्रकल्पाबाबत माहिती देत असताना प्रकल्पाच्या तत्वानुसार स्वच्छ आणि चांगल्या दर्जाचा कापूस राहण्याकरिता लुपिन फाउंडेशन ने एक कॉटनची कापूस वेचणी करिता नवीन पद्धतीची खोळ तयार केली असून त्यामुळे कपासत येणेरी घाण , काडी , कचरा ही मिक्स होणार नाही अशा प्रकारची ही खोळ तयार केलेली आहे . जेणे करून कापसाच्या प्रतवारीत सुधारणा होईल हे उपस्थित शेतकारींना मार्गदर्शन केले . सदर उपक्रम हा लुपिन फाऊंडेशनचे विभागीय प्रकल्प व्यवस्थापक योगेश राऊत , प्रकल्प व्यवस्थापक लक्ष्मण खोसे , सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक सुनील सैंदाणे जिल्हा प्रकल्प समन्वयक दिपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला . कार्यक्रमा करिता सर्व कृषि मित्रांते सहकार्य लाभले .








