Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने सामूहिक कन्या पूजन

team by team
October 16, 2021
in सामाजिक
0
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने सामूहिक कन्या पूजन
नंदुरबार l प्रतिनिधी-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती जिल्हा नंदुरबार च्या वतीने सामूहिक कन्या पूजनाचा कार्यक्रम दहिंदुले ता जि नंदूरबार येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी जनजाती समाजातील 108 कन्यांचे पूजन व गौरव करण्यात आला.
या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देवमोगरा माता, सप्तशृंगी माता, भारत माता यांचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविकात कार्यक्रमाची भूमिका विशद करताना समितीचे कार्यवाह उमेश शिंदे म्हणाले की, भारतीय संस्कृतीत नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने घराघरात कन्यापूजन होत असते. स्त्री शक्तीचा सन्मान करण्याची भावना यातून समाजात दिसून येते. धार्मिकते सोबतच सामाजिक दायित्व निभावण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 यावेळी 108 कन्यांचे धार्मिक पद्धतीने चरण प्रक्षालन व पाद्यपूजन सेवासहयोगी अभय व अंजलीबेन अग्रवाल तसेच माताजी पिताजी  कन्हैयालाल व कांताबेन अग्रवाल खुराल मेडिकल परिवार यांनी केले. तसेच कन्याकांना सामूहिक अल्पोहार व मिष्ठान्न, मंगल वस्र स्वरूपात ड्रेस, सौंदर्यसाधने, शैक्षणिक साहित्य आदि  वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी देवगिरी कल्याण आश्रमचे प्रांत सहसचिव वीरेंद्र वळवी यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात व्हावे असे प्रतिपादन केले.
समितीच्या जिल्हा उपाध्यक्षा  प्रितीताई बडगुजर यांनी जनकल्याण समितीच्या माध्यमातून सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाण्याच्या भूमिकेने सातत्याने समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात तसेच आपत्ती मध्ये धावून जाऊन समाजाला आधार देण्याचे कार्य करण्यात येते असे सांगितले.
यावेळी जनजाति सुरक्षा मंच चे प्रांत संयोजक डॉ. विशाल
 वळवी, कल्याण आश्रमचे जिल्हा अध्यक्ष गिरीश वसावे, जनकल्याण समितीचे सुनिताताई पवार, हेमाताई रेखी, नरेंद्र जोशी, हर्षल पत्की, यश रेखी, जनशिक्षण समितीचे उपाध्यक्ष गिरिष बडगुजर दहिंदुले बुद्रुक चे सरपंच ताईबाई वसावे व उपसरपंच दिपक मराठे, दहिंदुले खुर्द चे सरपंच बन्या  ठाकरे उपसरपंच उमाकांत पटेल, पंचायत समिती सदस्य सीमाताई मराठे, जनजाती सुरक्षा मंच जिल्हा संयोजक रवींद्र वळवी, रमेश कोतवाल, राजू राजपूत, गंगाराम वळवी, जगदीश जाधव, हरीश मराठे यांच्यासह ग्रामस्थ व पालक मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे पौरोहित्य अरविंदजी विंगळे गुरुजी व विजयराव गव्हाळे गुरुजी यांनी केले तसेच सूत्रसंचालन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह प्रमोद साळुंखे यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

पालिकेतर्फे मा बेटी उद्यानाचे आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

कोळदा येथे लुपिन फाऊंडेशनतर्फे कापूस पीक शेतीशाळा उत्साहात

Next Post
कोळदा येथे लुपिन फाऊंडेशनतर्फे कापूस पीक शेतीशाळा उत्साहात

कोळदा येथे लुपिन फाऊंडेशनतर्फे कापूस पीक शेतीशाळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026
भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

August 20, 2026
महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

August 20, 2026
तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा:  आ.चंद्रकांत रघुवंशी

तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा: आ.चंद्रकांत रघुवंशी

August 16, 2026
भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add