नंदुरबार l प्रतिनिधी-
पूर्वांचल राज्यातील आसाम ,अरुणाचल प्रदेश मेघालय नागालँड त्रिपुरा सिक्कीम या भागातील विद्यार्थ्यांना विविध राज्यांची ओळख पाठवतो लगेच भावी यासोबतच आदिवासी संस्कृती दर्शन व्हावं यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता यात्रेचा आयोजन करण्यात आले आहे.
अंतर राज्य छात्र जीवन दर्शन प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एकात्मतेचा भाव जागृत करण्यासाठी नम्र उद्देशाने काम करणारा हा अभाविपचा एक आयाम आहे. ईशान्य भारतातील तरुण आणि इतर देशांमधील बंधुत्वाची भावना वाढवण्याच्या उद्देशाने अंतरराज्य छात्र जीवनदर्शनची (SEIL) १९६६ साली स्थापना करण्यात आली. तेंव्हापासुन अभाविपने सीलच्या उपक्रमांतर्गत वार्षिक अभ्यास दौरा आणि सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम आयोजित करण्यास सुरूवात केली.
ज्याने अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला स्पर्श केला आहे. अंतर राज्य छात्र जीवन दर्शन यात्रेमुळे तरुणांमध्ये भावनिक संबंध निर्माण करण्याच्या प्रयत्नात प्रत्येक विद्यार्थ्याला स्थानिक यजमान कुटुंबात सामावून घेतले जाते, जेथे त्यांना पाहुणे नव्हे तर कुटुंबातील सदस्य म्हणून वागणूक दिली जाते. या उपक्रमामुळे भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना स्थानिक संस्कृती आणि सवयी चांगल्याप्रकारे समजण्यास मदत होते आणि यजमानांना देशाच्या इतर भागांमध्ये अस्तित्त्वात असलेल्या संस्कृतींची विविधता समजून घेण्यास मदत होत असते.
राष्ट्रीय एकात्मतेच्या दिशेने सततच्या दृष्टिकोनासोबतच अंतरराज्य छात्र जीवन दर्शन ईशान्य भारतातील तरुणांमध्ये कौशल्य विकास, आर्थिक साक्षरता आणि शिक्षणासाठीही काम करत आहे. राष्ट्राच्या प्रगतीसाठी ईशान्य भारतातील तरुणांची ऊर्जा समृद्ध करण्यासाठी सील यात्रेचे व्यासपीठ महत्वपूर्ण ठरत आहे.
यावर्षीची अंतर राज्य छात्र जीवन दर्शन यात्रा हि आपल्या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच येत आहे, तरी हि नंदुरबारकरांसाठी आनंदाची बाब आहे, या यात्रेत पूर्वांचल मधील विविध राज्यातून अनेक विद्यार्थी सहभागी होत असल्यामुळे तीन दिवसाच्या सील यात्रेसाठी अभाविप कार्यकर्त्याची जय्यत तयारी चालू आहे.
यामध्ये पूर्वांचलमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नंदुरबारचा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय, औद्योगिक विकासाचे जनजीवन अनुभवता यावे, यासाठी अभाविपकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये यात्रेसाठी आलेल्या प्रतिनिधीं नंदुरबार शहरातील विविध महाविद्यालयात होणाऱ्या ध्वजारोहणा साठी उपस्थित असणार आहेत व त्यांचे महाविद्यालयाचा प्रवेशद्वारावर देखील स्वागत करण्यात येणार आहे.
26 जानेवारी रोजी दुपारी नंदुरबार जिल्हाधिकारी ,पोलिस अधिक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सोबत राष्ट्रीय एकात्मता या विषयवार चर्चा साठी नेणार आहेत, सायंकाळी पतंग महोत्सव तसेच नंदुरबार मध्ये असलेल्या पर्यटन ठिकाणी देखील नेले जाणार आहे. महाविद्यालय परिसर पाहता यावा यासाठी महाविद्यालय प्रवास भेटीचे आयोजन करण्यात आले आहे, आपल्या शहरातील औद्योगिक क्षेत्राचा अभ्यास दौरा अशा विविध भेटीचे आयोजन करण्यात आले आहे.
यानंतर नंदुरबार शहरात २७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता नागरी समारोह सोहळा होणार आहे. या नागरी समारोह सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून नंदुरबार विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. डॉ. विजयकुमार गावीत उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सह संघटन मंत्री देवदत्त जोशी असणार आहेत. तसेच त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाने सील यात्रेचा समारोप होईल.
अंतरराज्य छात्र जीवनदर्शन यात्रेची स्वागत समिती पुढील प्रमाणे आहे.
अध्यक्ष डॉ. योगेश देसाई, उपाध्यक्षा डॉ. विक्रांत मोरे, सचिव अभिजीत खेडकर, सदस्य डॉ. विशाल वळवी, गिरीष बडगुजर, सदानंद रघुवंशी, प्रा. डॉ. सतिष देवरे, ऋषिका गावित, डॉ. स्वप्निल महाजन, डॉ. त्र्यंबक पटेल, डॉ. दिपक अंधारे, संदीप चौधरी
नंदुरबार आणि पूर्वांचल राज्यामधील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता भावना वृद्धिंगत करणारी ही यात्रा नंदुरबार मध्ये होणे ही भाग्याची गोष्ट आहे. आसाम ,अरुणाचल प्रदेश मेघालय नागालँड त्रिपुरा सिक्कीम या भागातील विद्यार्थ्यांना विविध राज्यांची ओळख निर्माण व्हावी यासाठी या एकात्मता यात्रेचे आयोजन विद्यार्थी परिषदेने केला आहे…
प्राध्यापक भूषण देशपांडे,,
शहराध्यक्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित पहिल्यांदाच नंदुरबार जिल्ह्यात पूर्वांचल भागात राहणारे विद्यार्थ्यांचे भारत दर्शन व्हावे या दृष्टीने राष्ट्रीय एकात्मता यात्रेचं आयोजन करण्यात आलेला आहे.. नंदुरबार व पूर्वांचल मधील आदिवासी संस्कृतींची एकात्मता विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता यात्रेतून होणार प्रकट…
सागर साठे,
जिल्हा सहसंयोजक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार.