नंदुरबार l प्रतिनिधी-
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत नुकतीच नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय मालपुर येथे विशेष ग्रामसभा घेण्यात आली असल्याचे तालुका कृषि अधिकारी व्ही. जे. पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
या सभेस सरपंच सुनिता वळवी, तालुका कृषी अधिकारी तथा प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा व्ही.जे. पाडवी, पाणलोट पथक प्रमुख आर. टी. पाटील, ग्रामसेवक सचिन पाटील, कृषी सहाय्यक सचिन वळवी, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वृंद, महिला बचत गटांचे अध्यक्ष आदि यावेळी उपस्थित होते.
या ग्रामसभेत केंद्र व राज्य शासन पुरस्कृत पाणलोट विकास कार्यक्रमाच्या निमित्ताने पाणलोट रथ यात्रेचे नियोजन करण्यात आले असून रथयात्रेपूर्वी करावयाची कामे व रथयात्रेच्या दिवशी करावयाची कामे त्यात जनजागृती, पाण्याची पाठशाळा प्रशिक्षण, पाणलोट योध्दा, धारिणी ताई निवड, शालेय स्पर्धा, वृक्ष लागवड, श्रमदानातून पाणलोट उपचार, मृदा व जलसंधारण व संरक्षणाची शपथ घेणे आदिंबाबत सविस्तर माहिती जिल्हा प्रकल्प समन्वयक ज्ञानेश्वर बाविस्कर यांनी यावेळी दिली
या कार्यक्रमास पाणलोट पथक सदस्य हरिष मोरे, विशाल घरटे, सौ. राधिका गावित तसेच पाणलोट विकास समिती सचिव कालुसिंग वळवी यांनी विशेष परिश्रम घेतले.