नंदुरबार l प्रतिनिधी
सोशल मिडीयाद्वारे रक्तदात्यांची साखळी निर्माण करुन रक्तदान या महान कार्यात पुढाकर घेणाऱ्या नंदुरबार येथील श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनचा ‘युवा जन कल्याण समिती तर्फे’ नॅशनल आयकॉन अवार्ड ने सन्मानित करण्यात आला आहे.
नंदुरबार येथील श्री. छत्रपती ब्लड फाऊंडेशन या संस्थेने व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातुन अनेक रक्तदात्यांची साखळी तयार केली आहे. जिल्हा रूग्णालयात रक्ताचा तुटवडा भासल्यावर व गरजु रूग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी या फाऊंडेशनच्या माध्यमातुन आवाहन केल्यावर गरजुंना रक्तदान करण्यासाठी रक्तदाते धावुन येतात. यामुळे वेळेवर रक्त उपलब्ध झाल्यावर रूग्णांना जीवदान मिळते. रक्तदान हे महान कार्य असून रक्तदानाची साखळी श्री छत्रपती ब्लड फाऊंडशनने सोशल मिडीयाच्या माध्यमातुन जोडुन ठेवली आहे. म्हणुन या कार्याची दखल घेत उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील युवा जन कल्याण समितीमार्फत श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला नॅशनल आयकॉन अवॉर्ड’ जाहीर केला. गोरखपूर येथे झालेल्या कार्यक्रमात
छत्रपती ब्लड फाऊंडेशनचे अरुण साळुंखे व रामकृष्ण पाटील यांना पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी उत्तर प्रदेश सरकारच्या उपाध्यक्षा चारू चौधरी. राज्यमंत्री पुष्पदंत जैन. कार्यक्रमाचे अध्यक्ष प.ब्रूजेश पांडे.वरीष्ठ समाजसेवक सुदा मोदी. यशवंतसीह राठोड सौरभ पांडे आदी उपस्थित होते. श्री. छत्रपती ब्लड फाऊंडेशनच्या चळवळीत महेंद्र झवर, जीवन माळी अजय देवरे, हितेश कासार, सुधीरकुमार ब्राम्हणे. पो.कॉ. अभय राजपूत आदींचे योगदान आहे.