Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पिण्याचे पाण्याची न‍ियमित रासायनिक व जैविक तपासणी आवश्यक : मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार

team by team
January 23, 2025
in राजकीय
0
पिण्याचे पाण्याची न‍ियमित  रासायनिक व जैविक तपासणी  आवश्यक :  मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार

नंदुरबार l प्रतिनिधी

ग्रामस्थांना पिण्याचे पुरेसे व शुद्ध पाणी पुरव‍िणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. जलजन्य आजार व साथीपासून बचाव करणेसाठी ग्रामस्तरावर पिण्याचे पाण्याची वेळोवेळी रासायनिक व जैविक तपासणी करणे आवश्यक आहे. यासाठी क्षेत्रीय स्तरावरिल कर्मचारी व ग्रामपंचायत प्रशासन यांनी सजग रहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांनी केले.

जिल्हा परिषद येथील याहा मोगी सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षण संपन्न झाले.या प्रशिक्षणात उपस्थ‍ितांना मार्गदर्शन करताना सावन कुमार बोलत होते. जिल्हयातील ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे व पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता कायम राहावी यासाठी राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती ग्रामस्तरापर्यंत पोहचावी यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते .
प्रशिक्षणाचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, प्रकल्प संचालक राहुल गावडे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी पांडु रंग कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार कुसुरकर , जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक व‍िवेक गुंड , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर बी सोनवणे , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप पुंड ,मुख्य् व‍ित्त् लेखा अध‍िकारी प्रव‍िण देवरे,ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजय पाटील आदी उपस्थित होते.यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांनीही उपस्थ‍ितांना मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणात जिल्हा पाणी गुणवत्ता निरिक्ष्क किशोर सोनवणे यांनी पिण्याच्या पाण्याचे स्वच्छता सर्वेक्षण , लाल कार्ड पिवळे कार्ड , हिरवे कार्ड ,जिल्हा पाणी गुणवत्ता तज्ञ नितिन पाटील यांनी पाणी गुणवत्ताविषयक शासन निर्णय, पाणी नमुने तपासणी , पाणी नमुने तपासणीचे माणके , रासायनिक व जैविक पाणी नमुने तपासणी मोहिम तर साधनव्यक्ती सुरेश महाले यांनी पाण्याचे महत्व् व दूषित पाण्यामुळे निर्माण होणारे विविध आजार याविषयी मार्गदर्शन केले .

 

 

प्रास्ताविक जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक व‍िवेक गुंड यांनी केले. प्रशिक्षणास पंचायत समितीचे सर्व गट विकास अधिकारी , सर्व तालुका वैद्यकिय अधिकारी, पाणी पुरवठा व‍िभागाचे सर्व उपअभ‍ियंता व शाखा अभ‍ियंता , विस्तार अधिकारी (पंचायत व आरोग्य ),जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेचे कर्मचारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील कर्मचारी, सर्व गट व समूह समन्वयक उपस्थित होते . सूञसंचालन व आभार जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुनिल पाटील यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

गोरखपूर ( उत्तरप्रदेश ) येथे श्री छत्रपती ब्लड फाउंडेशनचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान

Next Post

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

Next Post
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add