नंदुरबार l प्रतिनिधी-
नर्मदा काठावरील गावांना सेवा देण्यासाठी नवीन नवीन बोट ॲम्बूलन्स जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली असून या बोटीचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांची प्रमुख उपस्थिती होती.
याविषयी अधिक माहिती अशी की, नर्मदा काठावरच्या नंदुरबार जिल्ह्यातील धडगावच्या अतिदुर्गम भागातील अनेक गावांमधील दळणवळण पाण्यात चालणाऱ्या बोटींवर अवलंबून असते. त्या भागातील गावांना पुरेशी सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून खासदार पदी असताना डॉक्टर हिनाताई गावित यांनी केंद्रस्तरावर तर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून डॉक्टर सुप्रिया गावित यांनी संबंधित विभागांना पत्र व्यवहार केला होता.
त्या प्रयत्नामुळे सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला. त्यातूनच ही नवीन स्पीड बोट नर्मदा काठावरील गावांच्या सेवेत दाखल झाली आहे. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2025 रोजी नर्मदा काठावरील भूषा येथे या बोटीचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांची प्रमुख उपस्थिती होती.
नर्मदा काठावर कार्यरत असलेल्या बार्ज आणि बोट पेक्षा ही नव्याने दाखल झालेली स्पीड बोर्ड जलद गतीने सेवा देणार असून 33 गावांना याचा लाभ होईल स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून भूषा गावाला बोटीतून यायला याच्या आधी सहा तास लागायचे त्या ऐवजी नव्या स्पीडबॉटमुळे अवघ्या दोन तासात हे अंतर कापता येणार आहे अशी माहिती या प्रसंगी डॉक्टर सुप्रिया गावित यांनी दिली