नंदुरबार | प्रतिनिधीभरधाव मालवाहु रिक्षाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना अंकलेश्वर- बर्हाणपूर महामार्गावरील टोल नाक्याजवळ घडली. याप्रकरणी रिक्षा चालकाविरूध्द अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोदा तालुक्यातील शिर्वे येथील कृष्णा दिगंबर गावीत (२३) हा युवक दुचाकीने (क्र.एम.एच.३९-ए.एफ.९४२०) अंकलेश्वर-बर्हाणपूर महामार्गाने जात होता. भरधाव वेगातील छोटाहत्ती रिक्षाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात कृष्णा दिगंबर गावीत हा युवक गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाला. तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. याबाबत दिगंबर हुरजी गावीत यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षा चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे.कॉ. शिरसाठ करीत आहेत.
श्री.महेश शांताराम पाटील
9404747458
At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458