Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर औद्योगिक वसाहतीमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणार : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

team by team
January 8, 2025
in राजकीय
0
भालेर औद्योगिक वसाहतीमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणार : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

नंदुरबार l प्रतिनिधी

भालेर औद्योगिक वसाहतीच्या विकासामुळे नंदुरबार जिल्ह्यात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि औद्योगिक प्रगतीला चालना मिळेल,” असे मत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी व्यक्त केले. त्यांनी भालेर औद्योगिक वसाहतीच्या जागेची पाहणी करून तेथील विकासासाठी पायाभूत सुविधांच्या उभारणीबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या.

औद्योगिक वसाहतीसाठी पाण्याची तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. “भालेर औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

*मूलभूत सोयी-सुविधा उभारण्यावर भर*
औद्योगिक वसाहतीचा विकास गतीमान करण्यासाठी पाणीपुरवठा, रस्ते, वीजपुरवठा यांसारख्या मूलभूत सोयी-सुविधा विकसित करणे आवश्यक आहे. यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश देताना त्यांनी भालेर औद्योगिक वसाहतीच्या विकासामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून स्थानिक तरुणांना स्थिर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. औद्योगिक वसाहतीमुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला.

पाहणीवेळी जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक दिगंबर पारधी, जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक दिपक सूर्यवंशी, तहसीलदार (नंदुरबार) मिलींद कुलथे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

मुख्यमंत्री फडणवीस यांचा अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम

Next Post

चाचा नेहरू बालमहोत्सवाचे नंदुरबारमध्ये उत्साहात उद्घाटन

Next Post
चाचा नेहरू बालमहोत्सवाचे नंदुरबारमध्ये उत्साहात उद्घाटन

चाचा नेहरू बालमहोत्सवाचे नंदुरबारमध्ये उत्साहात उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add