नंदुरबार l प्रतिनिधी-
व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना पत्रकारांसाठी काम करीत असून देशभरात संघटनेचे विस्तार वाढलेले आहे. पत्रकारांच्या अनेक प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत असून व्हॉईस ऑफ मीडियाच्या पाठपुरावामुळे राज्य शासनाने पत्रकारांसाठी पत्रकार कल्याण महामंडळाची स्थापना केली आहे. उर्वरित मागण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन संघटना काम करीत आहे, असे प्रतिपादन व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर यांनी पत्रकार दिनी केले.
व्हॉईस ऑफ मीडिया नंदुरबार जिल्हा व नंदुरबार तालुका यांच्या विद्यमाने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार शहरातील श्री द्वारकाधीश मंदिर सभागृहात पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून अभिवादन करीत दर्पणकारांच्या स्मरणास उजाळा देण्यात आला. याप्रसंगी व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, नंदुरबार जिल्हाध्यक्ष रमाकांत पाटील, धनराज माळी, दीपक कुलकर्णी, गजेंद्र शिंपी, जीवन पाटील, दिलीप बडगुजर, विष्णू पाटील, शांताराम पाटील, नितीन गोसावी, अकील पिंजारी, मनोहर चौधरी, सुरेश जैन, मनोज मराठे, मंगलदास पानपाटील, नितीन पाटील, शेषराव गजबे, रोहित पाटील, महादु हिरणवाळे, ईश्वर फाळके, राजू मराठे, प्रकाश जानी आदी उपस्थित होते. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, जिल्हाध्यक्ष रमाकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात राज्य शासनाच्या सरळ सेवा भरतीतून नाशिक जिल्हा परिषदेत आरोग्य विभागात आरोग्य सेविकापदी निवड झाल्याबद्दल लिना महादू हिरणवाळे हिचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश ठाकुर यांनी केले. आभार नंदुरबार तालुकाध्यक्ष वैभव करवंदकर यांनी मानले.