नंदुरबार l प्रतिनिधी-
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 6 जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पत्रकार दिवसाचे औचित्य साधत नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आज नंदुरबार शहरातील पत्रकार भवन येथे पत्रकार दिवस साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संपादक सूर्यभान राजपूत हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष जगदीश सोनवणे ,पत्रकार मनोज शेलार ,वरिष्ठ पत्रकार दीपक कुलकर्णी, जीवन पाटील, धर्मेंद्र पाटील, दैनिक पुण्यनगरी चे अविनाश भामरे , भिकेश पाटील, सदाशिव राजपूत ,साप्ताहिक पत्रकार संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळे व जिल्हा मराठी पत्रकार संघाचे नवनियुक्त समन्वयक विशाल मोहन माळी आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती दिली. यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे समन्वयक विशाल मोहन माळी यांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या यथोचित सत्कार करण्यात आला. याकार्यक्रमाला सर्व दैनिकांचे प्रतिनिधी , इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी साप्ताहिकांचे प्रतिनिधी,युट्युब चॅनलचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपला महाराष्ट्र चे जिल्हा प्रतिनिधी रंणजीत राजपूत यांनी केले तर आभार प्रदर्शन दैनिक पुण्यनगरी चे अविनाश भामरे यांनी मानले…