नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील तिघा जलतरणपटूंनी राज्यस्तरीय अॅक्वाथ्लॉन स्पर्धेत सहभागी होवून घवघवीत यश संपादन केले. नंदुरबार नगरपरिषद संचलित स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे सदस्य देव अभयसिंग राजपूत, निर्मल भूपेंद्रसिंग आरंभी, आदित्य मिलींदकुमार पिंपळे यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
महाराष्ट्र ट्रायथ्लॉन असोसिएशन व जळगाव जिल्हा ट्रायथ्लॉन असोसिएशन मार्फत महाराष्ट्र राज्य ट्रायथ्लॉन व अॅक्वाथ्लॉन चॅम्पॅयनशिप 2025 चे जळगाव येथे आयोजन करण्यात आले होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जलतरण तलावात नुकत्याच या स्पर्धा पार पडल्या. अॅक्वाथ्लॉन स्पर्धेत नंदुरबार नगरपरिषद संचलित स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे जलतरणपटू देव अभयसिंग राजपूत, निर्मल भूपेंद्रसिंग आरंभी, आदित्य मिलींदकुमार पिंपळे यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
अॅक्वाथ्लॉन स्पर्धेत पोहणे व धावणे याचा समावेश असतो. या स्पर्धेत तिघा जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. याबद्दल त्यांचा मॅडल व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. या खेळाडूंना महाराष्ट्र ट्रायथ्लॉन असोसिएशनचे सचिव राजेंद्र निंबाळते, प्रशिक्षक राहुल काळे, अमोल भोयर, संजय राजपूत, रणजित गावित, अमित गावित यांचे मार्गदर्शन लाभले.