Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

team by team
March 4, 2026
in शैक्षणिक
0
मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

नंदुरबार l प्रतिनिधी-

पथराई ता. नंदुरबार येथे मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने के. डी.गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय काव्यगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य शरद पाटील हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून संदीप ईशी यांनी उपस्थिती लाभली.

स्पर्धेचे परीक्षण विकास पाटील व श्रीमती विद्या पाडवी यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या मनोगताने झाली. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेचे महत्त्व, तिचा गोडवा व अस्मिता प्रभावीपणे मांडली.

प्रमुख अतिथी संदीप ईशी यांनी मराठी भाषेचा समृद्ध इतिहास उलगडून सांगितला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य शरद पाटील यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांचे मराठी भाषेसाठीचे योगदान हे महत्त्वपूर्ण असल्याने त्यांच्या जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो असे मत व्यक्त केले.तसेच काव्यगायन स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

 

 

स्पर्धेनंतर निकाल जाहीर करण्यात आला.यात प्रथम क्रमांक प्रतिक राजेंद्र पावरा, द्वितीय क्रमांक विकास दारख्या वळवी, तर तृतीय क्रमांक दक्ष शिवराज पाडवी व आकाश रमेश तडवी या विद्यार्थ्याने पटकावला.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शुभांगी पाटील यांनी केले, तर विकास पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन विकास पाटील, प्रवीण शिवदे, विनायक वळवी, सुरेश पाडवी व श्रीमती शुभांगी पाटील यांनी केले.
मराठी भाषेप्रती अभिमान जागवणारा व विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनावर ठसा उमटवून गेला.

बातमी शेअर करा
Previous Post

भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

Next Post

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

Next Post
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add