नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार नगर परिषद आरोग्य विभागाने शहरातील मुख्य बाजारपेठ, मंगळ बाजार, सुभाष चौक, सिंध्दी कॉलनी, सी. बी. पेट्रोलपंप परिसरातील हातलॉरी धारक, भाजीपाला, फळ, विक्रेते,व्यापाऱ्यांरी यांना सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकु नये या करिता आवश्यक जनजागृती केली. दरम्यान बंदी असलेल्या प्लास्टिक बाळगणाऱ्या दीडशे व्यावसायिकांना नोटीस देण्यात आली.
नंदुरबार शहर सुदर शहर संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या अधिसुचनेप्रमाणे शहरातील 150 भाजीपाला, फळ, चहा टपरी धारकांना नोटीसा बजावण्यात आली. नंदुरबार नगरपरिषद स्वच्छता विभागाकडील यांच्या पथका प्लास्टीक जप्तीची कार्यवाही केली. एकूण 10 किलो प्लास्टीकत्या अर्थी, संपूर्ण राज्यामध्ये प्लास्टीक पासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्या (Carry Bags) तसेच प्लास्टिक / थर्माकॉलपासून बनविण्यात येणाऱ्या वस्तु उदा. ताट, कप्स, प्लेट्स, ग्लास, काटे, वाटी, चमचे, फ्लेक्स, नॉन वोवन पॉलिग्रॉपीलेन बॅग्स (Non-Woven Polypropylene bags), बॅनर्स, तोरण, ध्वज, प्लास्टीक शिट्स, सर्व प्रकारचे प्लास्टीक वेष्टन इत्यादींच्या उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, विक्री करण्यास लवकरच राज्यात निर्बंध (बंदी) घालण्याचे प्रयोजन आहे. यामध्ये किरकोळ विक्रीसाठी अन्य वस्तुंच्या पॅकेजींगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टीक व प्लास्टीक शिटचा समावेश आहे.
या व्यापाऱ्यांकडून 5 हजार 300 दंडाची रक्कम वसुल करण्यात आली.
याकामी नंदुरबार नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. जी.व्ही एस. पवनदत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सॅनेटरी इन्सपेक्टर युवराज चव्हाण,सागर साळुके, दिलीप मराठे, रविंद्र काटे, किशोर वाडीले, हिदराज कोळी, राजेंद्र पाखले, दिपक पाटील, आरोग्य कर्मचारी, मनोहर पिंपळे, विक्रम कोली, एजाज शेख, सागर ढढोरे, राकेश सारसर, किशोर चौधरी, रविंद्र शेवाळे सागर निळ, दिपक मराठे, अरविंद्र राजपुत, सहुद शेख, कांतीलाल ढंढोरे, शरण जाधव, भगवान मराठे, इ. पथकाद्वारे कार्यवाही करणेत आली आहे. यापुढे शहरात प्लास्टीक विक्री करतांना किंवा वापर करतांना आढळून आल्यास त्यांचावर नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करणेत येईल. प्लास्टीक प्रतिबंधक पथकाकडून यापुढेही कार्यवाही सुरु राहील, तरी व्यापाऱ्यांनी व नागरीकांनी सहकार्य करावे.