नंदुरबार l प्रतिनिधी-
जिल्ह्यात २०२१ या वर्षी कोविड मुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचे लेखा परीक्षण व्हावे अशीअग्नी बिरसा क्रांती दलाने केली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात कोविड-१९ तसेच इतर आजारांनी एप्रिल, मे व जुन-२०२१ या महिन्यांत मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णांची खाजगी रुग्णालयांत उपचार घेतले असून, उपचारादरम्यान काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु भितीपोटी रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाकडे कोणतीही तक्रार केलेली नाही. या खाजगी रुग्णालयांनी मृत्यू झालेल्या, रुग्णांवर केलेला उपचार, आकारलेल्या अतिरिक्त देयकांबाबत तपासणी होणे आवश्यक आहे. काही रुग्णालयांनी कोविड रुग्णालय म्हणून मान्यता नसतांना उपचार केले आहेत. याबाबत चौकशी होणेबाबत आम्ही यापूर्वी देखील दि. २१/०१/२०२१ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन दिले आहेत.
परंतु आजपावेतो सदर निवेदनावर कुठलीही चौकशी झालेली नाही.तरी आपल्यास्तरावरुन संबंधित रुग्णालयांची चौकशी करावी व दोषी आढळणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बिरसा क्रांती दला तर्फे करण्यात आली आहे . सदर मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे यांना देण्यात आले यावेळी कार्याध्यक्ष विजय ठाकरे , उपाध्यक्ष सुरेश वळवी, जिल्हा सचिव अंकित वळवी,नवापूर तालुकाध्यक्ष महेश गावित ,नवापूर तालुका उपाध्यक्ष गणेश कोकणी आदी उपस्थित होते.