नंदुरबार l प्रतिनिधी-
शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील पत्रकार राधेश्याम कुलथे यांनी आपली मुलगी गार्गी हीचा वाढदिवसानिमित्त होणार्या खर्चाला फाटा देत समाज प्रति असलेली जाणीव दाखवत आगळावेगळा उपक्रम राबवित शहाद्यातील प्रेस मारुती मंदिराजवळील शहीद भगतसिंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,महाराष्ट्र राज्य संचलित मायबाप वृद्धाश्रमात आपल्या कुटुंबीयासोबत वयोवृद्ध आजी-आजोबांना अन्नदान करून केले. याप्रसंगी उबदार कपडे वाटप करून अनोख्या पध्दतीने आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला.
यावेळी वयोवृद्ध नागरिकांना एक मदतीचा हात म्हणून प्रत्येक व्यक्तीने वाढदिवस ,वर्षश्राद्ध, तसेच विविध कार्यक्रम प्रसंगी समाजातील आधार नसलेल्या वर्गाला मदत होईल. म्हणून आश्रमातील व्यक्तींना साहित्य अथवा अन्नदान स्वरूपात मदत करावी. असे आवाहन यावेळी संस्थेने केले. पत्रकार राधेश्याम कुलथे यांच्या सामाजिक उपक्रमाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. ते समाजातील गोरगरीब नागरिक व वंचितांच्या हितासाठी नेहमी अग्रेसर असतात. शैक्षणिक, व सामाजिक, कार्य अश्या विविध ठिकाणी समाज सेवेच्या हेतूने ते नेहमीच काम करतात. तसेच आश्रमातील सध्यस्थिती बद्दल जयेश पाटील, सचिन पावरा, पंकज अहिरे यांनी सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी राधेश्याम कुलथे त्यांचा पत्नी भावना कुलथे, आई ललिताबाई कुलथे ,शहीद भगतसिंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी – जयेश पाटील, सचिन पावरा, पंकज अहिरे, प्रदीप पाटील, मनोज दादा , वसंत पाटील,विनोद पाटील,रामदास पावरा , आनंदसिंग शेवाळे, आदित्य ढोढवे , एडवोकेट जयपाल सिंग गिरासे , हंसराज पाटील, प्रियांक पाटील, कमल पावरा,विक्की अहिरे, दशरथ घोडराज , राजेश्वरी महीरे, मिनाक्षी पाटील,क्रिष्णा कोळी, कविता कोळी वृद्धाश्रमातील आजी आजोबा यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते.